घरमुंबईराजगृह तोडफोडप्रकरणी मुख्य आरोपीला अटक

राजगृह तोडफोडप्रकरणी मुख्य आरोपीला अटक

Subscribe

घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील दादर हिंदू कॉलनी येथील राजगृह निवासस्थानात झालेल्या तोडफोड प्रकरणी मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. विशाल मोरे उर्फ विठ्ठल काण्या (२०) असे या आरोपीचे नाव असून तो कल्याण येथे राहणारा आहे. याआधी त्याचा साथीदार उमेश जाधव याला अटक करण्यात आली आहे.

दादर येथील ‘राजगृह’ या निवासस्थानावर करण्यात आलेल्या हल्ल्याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी आधी उमेश सीताराम जाधव (३५) या आरोपीला अटक केली होती. तो दगडफेक करणार्‍या मुख्य आरोपीला मदत करत होता. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ही कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता मुख्य आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

हिंदू कॉलनीमधील राजगृहाबाहेरच्या फुलझाडांची, कुंड्यांची मंगळवारी नासधूस करण्यात आली होती. यावेळी करण्यात आलेल्या दगडफेकीत राजगृहाच्या काचांचे नुकसान झाले होते. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे फोडून दगडफेक करून हल्लेखोरांनी पळ काढला होता. याबाबतची माहिती मिळताच माटुंगा पोलिसांसह मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहचले होते. या घटनेनंतर राजगृहाजवळ कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -