घरदेश-विदेशनवीन वर्षात अडचणी टाळण्यासाठी हे बदल नक्की करा

नवीन वर्षात अडचणी टाळण्यासाठी हे बदल नक्की करा

Subscribe

वर्ष केवळ कॅलेंडरवर बदलते. पण, रोजच्या जीवनाचे काय, असा प्रश्न नेहमीच विचारला जातो. मात्र, हा प्रश्न म्हणजे अर्धसत्य आहे. कारण वर्ष बदलत असताना आपल्याला काही बदल करावे लागतात. पुढे त्रास होऊ नये म्हणून हे बदल अपरिहार्य असतात. त्यानुसार कार्यवाही झाली नाही तर पुढील संपूर्ण वर्षात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे वर्ष बदलत असतानाही सतर्क राहणे गरजेचे असते. वर्ष बदलत असताना नेमके काय बदल करावे लागतात, त्याचा थोडक्यात आढावा आपण घेऊ.

आयकर भरा
२०१७-१८सालाचा आयकर भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०१८ होती. मात्र, तोपर्यंत तुम्ही आयकर भरला नसेल तर ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत संधी होती. आता तिही डेडलाईन चुकली असेल तर आपल्याकडे ३१ मार्च २०१८ पर्यंतचा कालावधी आहे. हो! मात्र, त्यासाठी आपल्याला १० हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.

- Advertisement -

कारची किंमत वाढणार
टाटा, रेनॉ, फॉक्सवैगन, इसुजु मोटर्स यासारख्या ऑटो कंपन्यांनी १ जानेवारी २०१९ पासून आपल्या कारच्या किमती वाढवण्याचे जाहीर केले आहे. टाटाने तर आपल्या प्रत्येक मॉडेल कारचे मूल्य ४० हजार रुपयांनी वाढवण्याचे जाहीर केले आहे.

जुने डेबिट, क्रेडिट कार्ड बदला
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्व बँकांना जुने मॅग्नेटीक स्ट्राइप कार्ड ३१ डिसेंबरपर्यंत बदलण्याचे आदेश दिले आहेत. त्याबदल्यात ईएमवी कार्ड देण्यात येणार आहे. जुने कार्ड आपण बँकेच्या शाखेत जाऊन अथवा नेट बँकिंगच्या माध्यमातून बदलू शकता. पण ३१ डिसेंबरनंतर जुने कार्ड ब्लॉक होणार आहे, असे आरबीआयने जाहीर केले आहे.

- Advertisement -

१५ लाख अ‍ॅक्सिडेंटल कव्हर
१ जानेवारीपासून वाहन अपघातात मिळणारी विम्याची रक्कम १ लाखापासून वाढून १५ लाख होणार आहे. इन्श्युरन्स रेग्युलेटरी ऑथरिटी ऑफ इंडियाने इन्श्युरन्स कंपन्यांना दिलेल्या आदेशानुसार इन्श्युरन्स पॉलिसी १५ लाखांपर्यंत वाढवण्यास सांगितले आहे.

चेकबुक बदला
आपण कोणाला दिलेला चेक बाऊन्स होणार नाही याची काळजी घेण्यासाठी आपले चेकबुक बदला. कारण नवे चेकबुक सीटीएस प्रणालीचे आहे. या नव्या चेकच्या डाव्या बाजूला सीटीएस-२०१० असे लिहिलेले असते. त्यावरून ते सहज ओळखता येतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -