कोरोनामुळे मरणार्‍यांमध्ये पुरुषांची संख्या जास्त

Corona Crisis: Death toll from corona doubles official figures WHO Say
Corona Crisis:कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा अधिकृत आकडेवारीपेक्षा दुप्पट,WHOची धक्कादायक माहिती

कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कायम असला तरी मुंबईतील रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. मुंबईमध्ये १० हजार ९३५ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. मात्र महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार सप्टेंबरपर्यंत मुंबईमध्ये झालेल्या ८ हजार ४०५ मृतांमध्ये पुरुषांची संख्या सर्वाधिक आहे. कोरोनाने ५ हजार ६०० पुरुषांचा तर २ हजार ८०५ महिलांचा बळी घेतला आहे.

सात महिन्यांत ८,४०५ जणांचा मृत्यू

जगभरात अजूनही कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव कायम आहे. अनेक देशात कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे पुन्हा लॉकडाऊन करण्यात आला आहे. तसेच सध्या कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक देशांमध्ये लस तयार करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. तसेच देशातसुध्दा कोरोना संसर्ग पूर्ण थांबलेला नाही. भारतात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी २३ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आलेला होता. तेव्हा सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण हे मुंबईत सापडत असल्याने मुंबईत कडकडीत लॉकडाऊन लागू करण्यात आलेला होता. कोरोना काळात मुंबईतील कोरोनाबांधित रुग्णांच्या संख्येने मोठी चिंता निर्माण झाली होती लोकसंख्येची जास्त असलेली घनता दाट लोकवस्ती अशा विविध कारणांमुळे कोरोना वाढीचा दर मोठा होता. यावर नियंत्रण मिळवण्यात काहीसे यश आल्याचे चित्र आता दिसून येत आहे.आतापर्यंत मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या २ लाख ६४ हजार २२८ इतकी आहे तर बुधवारी महापालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत ११ हजार ९०३ सक्रिय रुग्ण आहे. मुंबईत आजवर कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या २ लाख ८७ हजार ८९८ इतकी आहे.

पुरुषांचे प्रमाण मुंबईत सर्वाधिक

मुंबईत १५ मार्च २०२० ते १५ सप्टेंबर २०२० या ७ महिन्याच्या कालावधी मुंबईत कोरोनामुळे ८ हजार ४०५ नागरिकांच्या मृत्यू झालेला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यापैकी ५ हजार ६०० एवढी संख्या ही पुरुषांची तर २ हजार ८०५ इतकी महिलांची संख्या आहे. कोरोनामुळे जीव गमावणार्‍यांमध्ये पुरुषांचे प्रमाण मुंबईत सर्वाधिक असल्याची माहिती आरटीआयतंर्गत समोर आली आहे. बुधवारी राज्यात ४,९८१ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १८ लाख ६४ हजार ३४८ झाली आहे. राज्यात ७३ हजार १६६ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आतापर्यंत मृतांची संख्या ४७,९०२ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५७ टक्के एवढा आहे.