घरमुंबईममता बॅनर्जी यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली; वाचा काय आहे प्रकरण?

ममता बॅनर्जी यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली; वाचा काय आहे प्रकरण?

Subscribe

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. पण या अर्जाच्या विरोधात ममता बॅनर्जी यांनी देखील मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

पश्चिम बंगाल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रगीताचा अनादर केल्याचा आरोप करत याविरोधात कनिष्ठ न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या अर्जाविरोधात ममता बॅनर्जी यांनी देखील एक याचिका दाखल केली होती. ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आली आहे. वास्तविक, राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी ममता यांच्याविरोधात कनिष्ठ न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. ममता बॅनर्जी यांच्याशी संबंधित हे प्रकरण २०२१ सालचे आहे. ज्यामध्ये त्यांच्यावर राष्ट्रगीताचा अनादर केल्याचा आरोप करण्यात आला होता.

हेही वाचा – पाकिस्तानसोबतच यंदा चीनही निशाण्यावर…; अजित डोवाल यांनी दोन्ही देशांना घेरलं

- Advertisement -

मुंबई भाजपचे सरचिटणीस विवेकानंद गुप्ता यांनी ममता बॅनर्जी यांच्याविरोधात महानगर दंडाधिकारी न्यायालयात या प्रकरणानंतर ही याचिका दाखल केली होती. त्यामुळे या तक्रारीनुसार न्यायालयाने मार्च २०२२ मध्ये ममता बॅनर्जी यांना समन्स बजावले होते. याच समन्स विरोधात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या २०२१ मध्ये मुंबईच्या दौऱ्यावर आल्या होत्या. त्यावेळी यशवंतराव चव्हाण सभागृहात एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रगीत सुरू असतानाही ममता बॅनर्जी उभ्या राहण्याऐवजी बसून राहिल्या होत्या, असा दावा या तक्रारीत करण्यात आला आहे. तर मध्येच ममता बॅनर्जी अचानक उभ्या राहिल्या आणि दोन ओळी गाऊन पुन्हा अचानक निघून गेल्या, असेही या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने ममता बॅनर्जी यांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावलेली आहे. ज्यामुळे ममता यांना सध्या तरी या प्रकरणात कोणताही दिलासा मिळणार नसल्याचेच दिसून येत आहे. त्यामुळे आता या प्रकरणी ममता बॅनर्जी यांच्यावर नेमकी काय कारवाई करण्यात येते, हे पाहणे देखील तितकेच महत्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – जयपूर साखळी बॉम्बस्फोटातील चारही दोषींची राजस्थान उच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -