Maharashtra Assembly Election 2024
घरक्राइमSexual Assault : मॉडेलवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एकास अटक; मोबाइलवर काढले अश्‍लील...

Sexual Assault : मॉडेलवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एकास अटक; मोबाइलवर काढले अश्‍लील व्हिडीओ

Subscribe

मॉडेलवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुणवंत ताराचंद जैन ऊर्फ निकेश मधानी या आरोपीस वर्सोवा पोलिसांनी अटक केली. त्याने पिडीत मॉडेलचे अश्‍लील व्हिडीओ बनवून तिला ब्लॅकमेल केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

मुंबई : मॉडेलवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुणवंत ताराचंद जैन ऊर्फ निकेश मधानी या आरोपीस वर्सोवा पोलिसांनी अटक केली. त्याने पिडीत मॉडेलचे अश्‍लील व्हिडीओ बनवून तिला ब्लॅकमेल केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर त्याला अंधेरीतील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. (man arrested for sexually assaulting model; obscene video taken on mobile)

या प्रकरणातील पिडीत महिला ही 30 वर्षांची मॉडेल असून तिच्या कुटुंबियांसोबत मालाड परिसरात राहते. मार्च महिन्यांत सोशल मिडीयावरुन तिची निकेश मधानीशी ओळख झाली. त्याने एका ऍवॉर्ड शो निमित्त त्याच्या अंधेरीतील राहत्या घरी बोलाविले होते. तिथे गेल्यानंतर त्याने तिला शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले. आणि त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Election 2024 : EVM घेऊन गेलेल्या एसटीमध्ये सापडले नोटांचे बंडल; कुठे घडला प्रकार?

त्यानंतर मोबाइलवर तिचे अश्‍लील व्हिडीओ बनवून तो तिला ब्लॅकमेल करत होता. तिचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल तसेच तिच्या पतीला पाठवून तिची बदनामीची तो तिला धमकी देत होता. या कालावधीत त्याने तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. या अत्याचारासह ब्लॅकमेल आणि जीवे मारण्याच्या धमकीला कंटाळून तिने वर्सोवा पोलिसात निकेश मधानीविरुद्ध तक्रार केली.

- Advertisement -

या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याच गुन्ह्यांत गुरुवारी निकेश मधानीला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर शुक्रवारी दुपारी त्याला अंधेरीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. निकेशची एक खासगी कंपनी असून या कंपनीत तो संचालक म्हणून काम करतो. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरू असून लवकरच त्याची वैद्यकीय चाचणी केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. (man arrested for sexually assaulting model; obscene video taken on mobile)

हेही वाचा – Chhattisgarh Naxalites : चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; वर्षभरात 200 जण ठार


Edited by : Ashwini A. Bhatavdekar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -