मुंबई : बॉम्बस्फोटासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी दिल्याप्रकरणी मिर्झा मोहम्मद बेग या 36 वर्षीय व्यक्तीस वरळी पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. (man arrested for threatening to blow up PM Narendra Modi; ats-local police operation in ajmer city)
मिर्झा हा झारखंडचा रहिवाशी असून अलीकडेच त्याची नोकरी गेली होती. त्यामुळे तो मानसिक नैराश्यात होता. दारुच्या नशेत त्याने वाहतूक पोलिसांना कॉल करुन ही धमकी दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे. ही धमकी देणे त्याच्या चांगलेच अंगलट आले आहे.
मिर्झा बेग हा मूळचा झारखंडचा रहिवाशी असून तो गुजरातच्य पालनपुर परिसरातील एका खासगी कंपनीत कामाला होता. कामावर असताना त्याने मद्यप्राशन केले होते. त्यामुळे त्याला कामावरून काढून टाकण्यात आले होते. त्यामुळे काही दिवसांपासून तो मानसिक तणावात होता. दोन दिवसांपूर्वी त्याने मद्यप्राशन केले होते. दारुच्या नशेत असताना त्याने वरळी येथील वाहतूक पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला फोन करत बॉम्बस्फोटासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला होणार असल्याची धमकी दिली.
हेही वाचा – Mumbai Accident : भरधाव बेस्ट बसने अनेकांना उडवले; 17 गंभीर तर तिघांचा मृत
याप्रकरणी वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन धमकी देणार्या व्यक्तीचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरू असताना मिर्झा बेग याला राजस्थानच्या अजमेर शहरातून पोलिसांनी अटक केली. धमकीनंतर तो गुजरातहून राजस्थानला गेला होता. अजमेरहून तो झारखंडच्या त्याच्या गावी जाणार होता. मात्र अजमेरला गेल्यानंतर त्याला एटीएस आणि वरळी पोलिसांच्या विशेष पथकाने ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच दारुच्या नशेत हा कॉल केल्याची कबुली दिली. पहिला कॉल त्याने झारखंड पोलिसांना तर दुसरा कॉल मुंबई पोलिसांच्या वाहतूक मुख्य नियंत्रण कक्षेला केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. कामावरुन काढून टाकल्याचा राग, त्यातून आलेले नैराश्यातून त्याने हा कॉल केला होता. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात येत आहे.
गेल्या सहा वर्षात पंतप्रधान मोदींना चार वेळा धमकी
गेल्या सहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चार वेळा जीवे मारण्याची धमकी आली आहे. पहिल्यांदा धमकीचा व्हिडीओ व्हायरल झाला, तर दुसऱ्या वेळी केरळमध्ये एक पत्र मिळाले होते. तिसऱ्या वेळेस फोनवरून धमकी मिळाली होती आणि आता परत एकदा धमकीचा फोन आला आहे.
हेही वाचा – Rahul Narwekar : सर्वांना सभागृहाची शिस्त पाळावी लागेल! नार्वेकरांनी सत्ताधारी, विरोधकांचे कान टोचले
Edited by : Ashwini A. Bhatavdekar