घरक्राइमप्रेयसीसाठी बायको, मुलाला केले बेघर; मुलावर केला कोयत्याने हल्ला

प्रेयसीसाठी बायको, मुलाला केले बेघर; मुलावर केला कोयत्याने हल्ला

Subscribe

पत्नी मुलांना घराबाहेर काढून प्रेयसीला घरात घेऊन मुलावर कोयत्याने हल्ला करणाऱ्या ४७ वर्षीय इसमाला ना.म.जोशी मार्ग पोलिसानी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या इसमाने पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांवर कोयत्याने हल्ला केला त्यात एका, दोन पोलीस जखमी झाले आहेत. अटक करण्यात आलेल्या इसमावर हत्येचा प्रयत्न आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना लोअर परळ येथील रेल्वे वर्कशॉप येथे घडली. जखमींना उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नक्की काय घडले? 

श्याम देऊळकर (४७) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. लोअरपरळ येथील रेल्वे वर्कशॉप समोर असणाऱ्या माधव भुवन या चाळीत पत्नी आणि १७ वर्षाचा मुलासह राहण्यास आहे. बुधवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास श्याम देऊळकर हा आपल्या प्रेयसीला घरी घेऊन आला आणि त्याने पत्नी, मुलाला घराबाहेर काढले. या भांडणात श्याम याने घरातून कोयता आणून स्वतःच्या हातावर मारून घेतला. मुलाने वडिलांच्या हातातील कोयता घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने मुलावर देखील कोयत्याने हल्ला केला.

- Advertisement -

चाळीतील रहिवाश्यांनी त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला असता त्याने रहिवाशांच्या अंगावर कोयता घेऊन धावू लागला. या घटनेची माहिती मिळताच ना.म. जोशी मार्ग पोलीस ठाण्याचे सपोनि. वायदंडे आणि पोलीस शिपाई किशोर पाटील, आटोळे हे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी श्याम देऊळकर याला शांत करण्याचा प्रयत्न केला असता त्याने पोलिसांच्या अंगावर धावून आला.

सपोनि वायदंडे यांनी प्रसंगावधान दाखवून हल्लेखोर श्याम याला पकडले असता झटापटीत वायदंडे यांच्या हातावर आणि आटोळे यांच्या बोटावर कोयता लागल्याने जखम झाली. त्याही अवस्थेत पोलिसांनी हल्लेखोर श्याम देऊळकर याला पकडून त्याच्या हातातील कोयता घेऊन जखमी मुलाला, त्याला उपचारासाठी रुग्णलयात आणले. रुग्णालयात जखमी झालेल्या मुलावर, वडील श्याम देऊळकर आणि जखमी पोलिसांवर उपचार करण्यात आले. याप्रकरणी ना.म जोशी मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून हल्लेखोर श्याम देऊळकर याला अटक करण्यात आली असल्याची माहिती वपोनी. प्रताप भोसले यांनी दिली.

- Advertisement -

हेही वाचा – आर्यनला पकडणारा NCB चा साक्षीदार किरण गोसावी गायब? पुणे पोलिसांकडून लूकआऊट नोटीस जारी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -