घरमुंबईहॉस्पिटलमध्ये उपचार सुरु; तरीही बजावला मतदानाचा हक्क

हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु; तरीही बजावला मतदानाचा हक्क

Subscribe

७१ वर्षीय के.के. अय्यर यांच्यावर तीन दिवसांपूर्वी मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. पण, तरीही त्यांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.

राज्यात चौथ्या टप्प्याचं मतदान सोमवारी झालं. विशेष म्हणजे यंदाच्या वर्षी अनेक वयस्कर व्यक्तींनी मतदान करून आपला हक्क बजावला आहे. मतदानाच्या दिवशी सुट्टी म्हटलं की अनेकजण बाहेर फिरायला जातात किंवा घरी आराम करण्याचा विचार करतात. तर, काहीजण मतदानासाठी असलेल्या रांगा पाहूनच घरी शांत बसणं पसंद करतात. पण, अशा लोकांसमोर आदर्श ठरले आहेत असे काही रुग्ण ज्यांच्यावर आजारावरील उपचार सुरू असतानाही त्यांना मतदानाचा हक्क बजावला आहे.

तीन दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया झालेल्या रूग्णाने केलं मतदान

७१ वर्षीय के.के. अय्यर यांच्यावर तीन दिवसांपूर्वी मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. पण, तरीही त्यांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. अय्यर दाखल असलेल्या हॉस्पिटलने अॅम्ब्युलन्सद्वारे त्यांना मतदान केंद्रावर नेलं आणि पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.

- Advertisement -

रुग्णाचे मतदान ठरले प्रेरणादायी

मुंबई सेंट्रलच्या वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल झालेला २८ वर्षीय तरुण चिंतन हरानिया या रुग्णाने सोमवारी झालेल्या मतदानाचा हक्क बजावत इतर मतदारांसमोर नक्कीच आदर्श ठेवला आहे. चिंतनच्या मते मतदान आवश्यक आहे आणि प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे. म्हणूनच, त्यांनी मत देण्याचे ठरवले.

डायलिसीसनंतर बजावला मतदानाचा हक्क

६९ वर्षीय विद्या नाडकर्णी डायलिसीस करून आल्या आणि त्यांनी मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. डायलेसिस करून आल्यानंतर अनेकदा रूग्णाला अशक्तपणा जाणवतो. पण, अशा स्थितीतही आजींनी आपला हक्क बजावला.

मतदान करायचं हे आईने अगोदरच ठरवलं होतं. त्यानुसार तिला पहिल्यांदा डायलिसीस करायला नेलं. त्यानंतर घरी आल्यानंतर थोडंस खाऊन ती लगेच मतदान करण्यासाठी निघाली. अशा परिस्थितीत देखील तिने मतदान केलं. त्यामुळे याचा नक्कीच इतरांनी आदर्श घ्यावा.
– अजय नाडकर्णी, विद्या यांचा मुलगा
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -