घरमुंबईलोकलमधून थुंकणे जिवावर बेतले

लोकलमधून थुंकणे जिवावर बेतले

Subscribe

लोकलमधून प्रवास करताना दरवाजावर लटकू नका, गाडीचे पायदान आणि फलाटामधील अंतरावर लक्ष द्या अशा अनेक उद्घोषणा प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वारंवार दिल्या जातात. मात्र तरीही प्रवाशी या उद्घोषणा गांभीर्याने घेत नाही. कित्येकदा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. असेच दुर्लक्ष खारमधील सुमीत यादव (१८) या तरुणाच्या जिवावर बेतले आहे. सोमवारी दुपारी खारहून हार्बरच्या लोकलमधून प्रवास करणारा सुमीत थुंकण्यासाठी लोकलच्या दरवाजावर आला. वडाळ्याकडील रावळी जंक्शन येथे आला असता त्याचा अचानक तोल सुटल्याने रुळावर पडून त्याचा जागीच मृत्यू झाला.

सोमवारी दुपारच्या सुमारास सुमीत यादव मित्रासोबत खार स्थानकाकडे आला होता. सुमीत आणि त्याचा मित्र सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये चढले. खार ते वांद्रेमधील रावळी जंक्शन या दरम्यान तो थुंकण्यासाठी म्हणून सुमीत लोकलच्या दरवाज्यावर आला. तो थुंकण्यासाठी खाली झुकला असता त्याचा तोल सुटल्याने तो खाली पडला. त्यात तो जबर जखमी झाल्याची माहिती वडाळा रेल्वे पोलिस ठाण्यास कळवण्यात आली. त्यानुसार रेल्वे पोलीस, वडाळा स्थानकातील कर्मचारी, हमाल आदी घटनास्थळी पोहोचले असता जखमी अवस्थेत असलेल्या सुमीतला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारा दरम्यान सुमिताचा मृत्यू झाला.

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -