Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम बायकोने गॅलरीत क्वारंटाईन केल्याचा राग अनावर, नवर्‍याचे कोयत्याने बायकोवर सपासप वार

बायकोने गॅलरीत क्वारंटाईन केल्याचा राग अनावर, नवर्‍याचे कोयत्याने बायकोवर सपासप वार

पोलिसांनी पतीला अटक केली असून करून त्याची रवानगी कोविड सेंटरमध्ये करण्यात आली आहे.

Related Story

- Advertisement -

कोरोनाची लक्षणे असलेल्या पतीला घरातील गॅलरीत क्वारंटाईन केल्यामुळे संतापलेल्या पतीने पत्नीवर कोयत्याने वार करून हत्या केल्याची खळबळजनक घटना नवी मुंबईतील पनवेल येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली असून करून त्याची रवानगी कोविड सेंटरमध्ये करण्यात आली आहे. संतोष पांडुरंग पाटील (वय ४०) असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. पनवेल मधील करंजाडे येथील साईसत्यम इमारत येथे पत्नी संध्या (वय ३५) सोबत संतोष पाटील हा राहण्यास होता.

संतोष हा काही दिवसांपासून आजारी होता. त्याला कोरोनाची लक्षणे असल्यामुळे पत्नी संध्या हिने पतीला डॉक्टरांकडे उपचारासाठी घेऊन न जाता घरातील गॅलरीत चार ते पाच दिवसापासून क्वारंटाईन केले होते. याचा राग येऊन संतोष याने शनिवारी सकाळी पत्नीसोबत भांडण केले. या भांडणातून संतोषने गॅलरीतून बाहेर येऊन घरातील कोयत्याने पत्नीवर वार केले आणि त्यात तिचा मृत्यू झाला.

- Advertisement -

याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करुन पती संतोष पाटील याला अटक केली. परंतु, त्याची अँटीजेन चाचणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याला जवळच्याच कोविड सेंटरमध्ये पोलिसांच्या देखरेखीत ठेवण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

- Advertisement -