घरमुंबईएटीएममध्ये तरुणीसोबत अश्लिल चाळे; विक्षिप्त तरुणाला अटक

एटीएममध्ये तरुणीसोबत अश्लिल चाळे; विक्षिप्त तरुणाला अटक

Subscribe

महिला सुरक्षेच्या बाबतीत अनेकदा चर्चा होते. कायदा व सुरक्षाव्यवस्थेचे धिंडवडे काढले जातात. मात्र सामान्य जनतेमध्येच काही नराधम असतात, ज्यांच्यामुळे महिला वारंवार अत्याचाराला बळी पडत असतात. मुलुंड येथे एक किळसवाणा प्रकार समोर आला आहे. मध्यरात्री एक तरूणी एटीएममध्ये पैसे काढायला गेली असता तिथे उपस्थित असलेल्या माथेफिरूने तिला आपले गुप्तांग दाखवले. या प्रकारामुळे सदर तरूणीला धक्काच बसला. मात्र तरिही तिने न घाबरता आरोपीचा व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. त्यानंतर पोलिसांनी व्हिडिओत अश्लिल हावभाव करणाऱ्या संदिप कुंभारकरला अटक केली आहे.

पीडित महिलेने आपल्या सोशल मीडियावर सदर घटनेचा व्हिडिओ शेअर करत आपली व्यथा मांडली. त्यात ती सांगते “रात्रीचे ३ वाजले होते. रिक्षाचे पैसे देण्यासाठी मी एटीएममध्ये आले. तिथे उपस्थित असलेल्या तरूणाने काही मदत करू का विचारले आणि एटीएममध्येच माझ्याशी लगट करायला लागला. मी त्याला विरोध केला. एटीएममध्ये कॅमेरे असून देखील त्या विक्षिप्त तरूणाने आपले गुप्तांग बाहेर काढले. त्याचा हा प्रकार पोलिसांना दाखवण्यासाठी मी व्हिडिओ रेकॉर्ड केला. मला वाटत होते की राहते तो परिसर सर्वात सुरक्षित आहे. पण माझा समज चुकीचा होता, असे वाटते.”

- Advertisement -

पीडित तरुणीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी देखील तिला पाठिंबा द्यायला सुरुवात केली आहे. जेव्हा पोलिसांना याबद्दलची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी देखील आरोपीचा पाठलाग करून त्याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही रात्री रिक्षाने तिच्या घराजवळ आली होती. रिक्षाचे भाडे ४५० रुपये झाले होते. मात्र जवळ पैसे नसल्याने तिने एटीएममधून पैसे काढण्याचे ठरवले. एटीएममध्ये एक माणूस आधीपासूनच उपस्थित होता. पीडितेला मदत देण्याच्या बहाण्याने तो तिच्याशी लगट करू लागला. त्यानंतर त्याने तो किळसवाणा प्रकार सुरु करताच पीडितेने व्हिडिओ काढायला सुरुवात केली. त्यानंतर आरोपीने तिथून पळ काढला.

View this post on Instagram

This is what happened: Last night, I was coming home from bandra after a gig and I stopped the rickshaw at an ATM near my house. I enter the ATM and I'm frustrated when the machine won't dispense money. This is the first time when the man (Sandeep Khumbharkar) enters the ATM and asks if I need help or want him to pay for the ride. I politely decline saying that I'll manage. Once I exit the ATM, I get into an argument with the rickshaw guy with regards to how I'll be paying him the fare. This is when a cop car pulls up and I explain my situation to them. 5-10 mins after talking to the cops, I say that I'll give the ATM another try. I'm once again at the ATM trying to withdraw money. And the man enters the ATM once again. But this time, he moves in closer and touches my shoulder and thigh, again asking if I need help. I instantly back off and yell at him to stay away from me and that I don't need his help. I go back to trying to withdraw money again, and he's still there. When I hear him, he's calling out to me and blatantly asking me to look at his hard dick that he had pulled out of his denim's zipper area. I quietly start my video recorder and turn the camera right at him. That's when he freaks out and runs out of the ATM. I run to the cop car and show them the video. They instantly start following the guy who has fled on his scooter. So today morning, I go the police station and they have already informed me that they have the guy in custody. He's crying and pleading. But I knew I had to take action against him. So along with my dad, I filed an FIR against him. He claimed to be drunk at the time, which does not exuse his actions at all. What he did, was scary and terrifying. This was a locality wherein I felt safe. But he has ruined it for me. I can't walk the streets feeling the same sense of safety. AND THIS IS MY HOME! I will be giving my official statement to the judge in the coming week and I plan on taking this man to court and make him pay for the way he made feel. What's baffling is that he felt it was okay to flash his dick in a place full of cameras. (Continued in comments)

A post shared by ?ℍ???ℕ? (@shibxni) on

- Advertisement -

एटीएमच्या बाहेर रात्रीची गस्त घालणाऱ्या पोलिसांना पीडितेने मोबाईलमधील व्हिडिओ दाखवला. पोलिसांनी संबंधित तरूणाचा पाठलाग करून त्याला अटक केली. त्यानंतर सकाळी पीडित तरूणी आणि तिच्या कुटुंबियांनी पोलिस स्टेशन गाठून आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -