Sunday, June 11, 2023
27 C
Mumbai
घर मुंबई Skin care : आंब्यामुळे त्वचा होईल तजेलदार

Skin care : आंब्यामुळे त्वचा होईल तजेलदार

Subscribe

आंबा जसा शरीराला पोषक असतो तसाच तो आपल्या स्किनसाठी अधिक उत्तम आहे. आंब्या पासून अनेक फेस पॅक तयार केले जातात. ज्यामुळे स्किन सुधारते. तसेच स्किनला याचा प्रभावी उपयोग होतो.

उन्हाळ्यातील प्रसिद्ध फळ म्हणून आंबा खाल्ला जातो. आंबा हे एक चवदार फळ आहे. आंब्याला फळांचा राजा देखील म्हटले जाते, चविष्ट असण्यासोबतच याचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहेत. या फळामध्ये फायबरचे प्रमाण अधिक आहे, त्यात फोलेट, बीटा कॅरोटीन, लोह, जीवनसत्त्वे ए आणि सी तसेच कॅल्शियम, झिंक आणि व्हिटॅमिन ई सारखे पोषक घटक असतात. आंब्यामध्ये अनेक गुणधर्म आहेत. ते पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर आहे.

Mango Face mask and its amazing benefits – Daily The Azb

- Advertisement -

आंब्याचा असा करा वापर त्वचा होईल तजेलदार-

  • आंब्याच्या साली बारीक करून दुधात मिक्स करून पेस्ट तयार करावी.
  • ती पेस्ट चेहऱ्यावर १५ मिनिटे लावावी.
  • त्याने सूर्यप्रकाशामुळे काळी पडलेली त्वचा उजळेल आणि चेहरा साफ होईल.
  • आंब्याच्या पानांचा अर्क त्वचेची बारीक रेषा, वृद्धत्वाची चिन्हे आणि कोरडेपणा कमी करतात.
  • हे कोलेजन उत्पादनात देखील मदत करते ज्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी होऊ शकतात.
  • आंब्याच्या पानांमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म असतो जे बॅक्टेरियाच्या त्वचेच्या संक्रमणांवर उपचार करण्यास मदत करतात जसे की स्टेफ इन्फेक्शन आणि त्वचा जळणे.
  • आंब्याचा लगदा थेट लावून तुम्ही तुमच्या त्वचेवर नैसर्गिक चमक मिळवू शकता.
  • आंब्याचा लगदा त्वचेवर समान रीतीने लावा आणि 30 मिनिटे सोडा.
  • आंब्यामध्ये असलेले अत्यंत पौष्टिक घटक तसेच त्यामध्ये असेलेले पल्प अँटिऑक्सिडंट्स, एएचए हे त्वचेसाठी फायदेशीर आहे.

हेही वाचा : Skin care : बजेट फ्री असलेले ‘हे’ 5 बेस्ट फेस पॅक ; नक्की ट्राय करा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -