घरमुंबईफुटकी अंडी देण्याच्या कारणावरूनच मंजुळा शेट्येला मारहाण

फुटकी अंडी देण्याच्या कारणावरूनच मंजुळा शेट्येला मारहाण

Subscribe

प्रत्यक्षदर्शीची कोर्टात साक्ष

भायखळा तुरुंगातील तुरुंगाधिकार्‍यांच्या खबर्‍यांना तुरुंगातील वॉर्डन मंजुळा शेट्ये हिने फुटकी अंडी दिली. या रागातून तुरुंग अधिकार्‍यांनी मंजुळा शेट्ये हिला बेदम मारहाण केली. त्यात मंजुळाचा मृत्यू झाला, असे मंगळवारी कोर्टात झालेल्या साक्षीत उघडकीस आले आहे. पोलिसांच्यावतीने मंगळवारी तुरुंगातील तिसर्‍या प्रत्यक्षदर्शी साक्षीदार महिलेची साक्ष सेशन कोर्टात नोंदवण्यात आली आहे. २३ जून रोजी, शुल्लक कारणावरून अटकेत असलेल्या सर्व आरोपींनी मंजुळाला बेदम मारहाण केल्याचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने कोर्टाला सांगितले.

भायखळा तुरुंगात शिक्षा भोगणार्‍या मंजुळा शेट्ये हिला २३ जून २०१७ रोजी तुरुंग अधिकारी मनीषा पोखरकर आणि तिच्या सहकार्‍यांनी बेदम मारहाण केली होती, त्यात तिचा मृत्यू झाला होता. या गुन्ह्याचा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभाग कक्ष ३ यांच्याकडे सोपवण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी तरुंग अधिकारी मनीषा पोखरकरसह महिला तुरुंग रक्षक बिंदू नाईकवडे, वसीम शेख, शितल शेगावकर, सुरेखा गुळवे आणि आरती शिंगने या सहा जणींना अटक करण्यात आली होती.

- Advertisement -

मुंबईच्या सेशन कोर्टात न्यायाधीश शायना पाटील यांच्या कोर्टात सुनावणी सुरु आहे. या सहाजणीं विरुद्ध कोर्टात आरोप निश्चित करण्यात आलेले आहेत. या सहा जणीविरुद्ध कलम ३०२ नुसार हत्या करणे, कलम १२० ब नुसार कट रचणे, कलम २०१ नुसार पुरावे नष्ट करणे आणि कलाम ५०१ नुसार मरेपर्यंत मारहाण करणे या कलमानुसार आरोप निश्चित करण्यात आले आहेत. अटकेत असलेल्या आरोपींनी हेतुपरस्पर मंजुळाची हत्या केल्याचे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.

भायखळा तुरुंगातील मंजुळाच्या बॅरेकमध्ये असणार्‍या सहा कैदी महिलांपैकी प्रत्यक्षदर्शी असणार्‍या कैदीनी या प्रकरणात साक्ष दिली आहे. त्यापैकी दोन साक्षीदारांची साक्ष कोर्टात यापूर्वी नोंदवण्यात आली असून मंगळवारी पोलिसांच्यावतीने तिसरी साक्षीदार महिला कैद्याची साक्ष सेशन कोर्टातील न्यायाधीश शायना पाटील यांच्या समोर नोंदवण्यात आली आहे. भायखळा तुरुंगातील तुरुंगाधिकार्‍यांच्या खबर्‍यांना तुरुंगातील वॉर्डन मंजुळा शेट्ये हिने फुटकी अंडी दिली. या रागातून तुरुंग अधिकारी आणि इतर सहकार्‍यांनी मंजुळा शेट्ये हिला बेदम मारहाण केली. त्यात मंजुळाचा मृत्यू झाला अशी साक्ष देण्यात आली आहे. न्यायालयाने ही साक्ष नोंदवली असून ९ मे रोजी आरोपींच्या बाजूने आरोपीचे वकील त्यांची बाजू मांडणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -