घरमुंबईरात्री-अपरात्री मनोज जरांगे यांना सभा घेण्याची मुभा कशी दिली जाते?; छगन भुजबळ...

रात्री-अपरात्री मनोज जरांगे यांना सभा घेण्याची मुभा कशी दिली जाते?; छगन भुजबळ यांचा सवाल

Subscribe

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण (Maratha reservation) मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) राज्यभर दौरे करत आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचे आयोजन देखील करण्यात येते. मात्र आयोजित करण्यात येणाऱ्या काही सभांवेळी नियमांचे उल्लंघ होत असल्याची माहिती समोर आली आहे.

मनोज जरांगे पटील यांनी रात्री-अपरात्री सभा घेण्याची परवाणगी कशी दिली जाते, असा प्रश्न छगन भुजबल (Chhagan Bhujbal)यांनी उपस्थित केला होता. छगन भुजबल यांनी केलेल्या अरोपानंतर धाराशिव आणि साताऱ्यामध्ये जरांगे पाटील यांची सभा आयोजति करणाऱ्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धाराशिव येते जरांगे पाटील यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र सभा रात्री उशीरापर्यंत सुरू होती. त्यामुळे आयोजकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

- Advertisement -

 

हेही वाचा.. ज्यांना कुणबी म्हणवून घेण्याची लाज वाटते ; जरांगे पाटील यांची समाजातील विरोधकांवर टीकास्त्र

- Advertisement -

मनोज जरांगे पाटील यांच्या 14 सभा झाल्यानंतर छगन भुजबळ यांनी उत्तर दिले आहे. जरांगे पाटील यांच्या दररोज 10 सभा होताता. त्यांना कोणतेही कायदेशीर बंद नाही. रात्री 12, 2 किंवा 4 वाजातही त्यांच्या सभा होत आहे. रात्री-अपरात्री सभा घेण्याची परवाणगी कोणी दिली असा सवाल भुजबळांनी केला आहे.

छगन भुजबळ यांनी केलेल्या सवालाला मनोज जरांगे पाटील यांच्या प्रतिउत्तर दिलं आहे. जरांगे पाटील म्हणाले की, मी कोणत्याही प्रकारचे शक्तीप्रदर्शन करत नाही, राज्यातील मराठा समाजाचा आशीर्वाद घेण्यासाठी जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये जात आहे.

धाराशिवमध्ये आयोजकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याबद्दल मला काहीच माहिती नाही, मी त्याबद्दल माहिती घेईन. मात्र सरकारने गुन्हे दाखल करण्याचं काम सुरू केलं आहे. रात्रभर इतर क्रार्यक्रम होत असतात. क्रिकेट रात्रभर चालतं, क्रिकेटचा आरडाओरडा सगळं चालतं. पण गोरगरीब जनतेचे प्रश्न मार्गी लागू नये, असं सरकारला वाटत असेल.

सरकारला जनतेशी काही देणंघेणं नसावं. आमचा एकही माणूस पोलिसांच्या कारवाईला घाबरत नाही. पोलिसांना जी कारवाई करायची आहे ती करू दे. पोलिसांबर कदाचित दबाव असेल, असं जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -