Manoj Patil Suicide Attempt Case: साहिल खानसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल

Manoj Patil Suicide Attempt Case Fir registered against sahil khan raja faujdar junaid kalivala and rubal dandkar
Manoj Patil Suicide Attempt Case: साहिल खानसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल

मिस्टर इंडिया बॉडी बिल्डर मनोज पाटीलने बुधवारी आत्महत्येचा प्रयत्न केला. मनोज पाटीलने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईट नोट लिहिली होती. ज्यात त्याने बॉलिवूड अभिनेता साहिल खानच्या नावाचा उल्लेख केला आहे. सध्या मनोज पाटीलवर मुंबईतील कूपर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. पण आता अभिनेता साहिल खानसह चार जणांविरोधात ठाण्यातील ओशिवरा पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनोज पाटीलने साहिल खानवर मानसिक त्रास देत असल्याचा आरोप केला आहे. पण काल साहिल खानने आपली बाजू मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. मनोज पाटील एक्सपायर झालेले स्टेरॉईड विकत होता, असा आरोप साहिलने केला आहे. पण मनोज पाटील हत्येप्रकरणी ओशिवार पोलीस ठाण्यात साहिल खान, राज फौजदार, जुनैद कालिवाला, रुबल दंडकर यांच्याविरोधात आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्यामुळे गुन्हा दाखल केला आहे. भारतीय दंड संहिता कलम ३०६, ५११, ५००, ५०६, ३४ अंतर्गत साहिल खानसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान मनोज पाटील हा मिस्टर ऑलिम्पियासाठी प्रयत्न करत होता. या स्पर्धेत साहिलला सुद्धा उतरायचे होते. त्यामुळे या स्पर्धेत मनोज पाटीलने सहभागी होऊ नये यासाठी साहिल खान प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सोशल मीडियावर साहिल खान आपली बदनामी करत असल्याचा मनोज पाटीलने केला आहे. त्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न करत असल्याचे मनोजने सांगितले आहे.


हेही वाचा – manoj patil-गाड्या धुणारा पोऱ्या ते मिस्टर इंडीया असा आहे ‘मनोज पाटील’चा प्रवास