घरताज्या घडामोडीमनसुख हिरेन हत्येप्रकरणी क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्याला समन्स

मनसुख हिरेन हत्येप्रकरणी क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्याला समन्स

Subscribe

मनसुख हिरेन हत्या प्रकरणी NIAने क्राईम ब्रँचमधील अधिकाऱ्याला समन्स बजावल्याचे समोर आले आहे. हिरेन हत्या प्रकरणामध्ये क्राईम ब्रँचमध्ये काम केलेल्या या अधिकाऱ्याची संशयास्पद भूमिका आढळली आहे. या अधिकाऱ्याची नुकतीच बदली करण्यात आली होती. सचिन वाझेने या अधिकाऱ्याकडे फोन दिला होता आणि त्याला बिझी असल्याचे कारण द्यायला वाझेने सांगितले होते.

माहितीनुसार, ४ मार्च रोजी मनसुख हिरेन यांची हत्या करण्यात आली होती. तेव्हा हा अधिकारी पोलीस आयुक्तालयातील सीआययूच्या कार्यालयात होता. सचिन वाझेने आपला फोन त्याच्याकडे दिला होता आणि कोणाचा फोन आलाच तर तो रिसिव्ह करून वाझे ऑफिसमध्ये असून बिजी असल्याचे सांगायला सांगितले होते. याआधीही या अधिकाऱ्याची एटीएस (ATS)कडून चौकशी झाल्याची सूत्रांची माहिती आहे. NIAला संशय आहे की, वाझे ठाण्याला गेला होता तेव्हा हा फोन या अधिकाऱ्याकडे मुद्दाम देण्यात आला होता.

- Advertisement -

दरम्यान आज NIAचे डीआयजी विधी कुमार NIA कार्यालयात पोहोचले आहेत. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर भरलेली स्कॉर्पिओ स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाच्या तपासाची घेणार माहिती आहेत. दरम्यान आज सचिन वाझे प्रकरणात सातवी गाडी जप्त केली आहे. कामोठेमधून आउडलँडर ही गाडी जप्त करण्यात आली आहे. बुधवारी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या याचिकेवर न उच्च न्यायालयाने तातडीची सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे.


हेही वाचा – Ambani security scare: एँटीलिया बाहेर स्कॉर्पिओ ठेवली, अन् मुंबई आयुक्तालयात इनोवा कार केली पार्क

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -