घरमुंबईएटीएसकडून हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास, पत्नीच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल

एटीएसकडून हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास, पत्नीच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल

Subscribe

एटीएसच्या पथकाचे तीन तास मनसुख हिरेन यांच्या घरी खलबतं

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण तसेच मुकेश अंबानी निवासस्थानी मिळून आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कार प्रकरणात दहशतवाद विरोधी पथकाने तपास हाती घेतला आहे. एटीएसचे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्या पथकाने मनसुख यांचा मृतदेह मिळालेल्या ठिकाणी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली आहे. मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्या, पुरावा, नष्ट करणे, कट रचणे या अनुषंगाने अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशातील प्रख्यात उद्योजक मुकेश अंबानी यांच्या मुंबईच्या घराबाहेर स्कॉर्पिओ कार आणि अवैध स्फोटकं सापडली होती. या कारमध्ये १७ जिलेटीनच्या कांड्या होत्या तसेच या गाडीचा मालक मनसुख हिरेनचा मृतदेह शुक्रवार ५ मार्चला ठाण्यातील मुंब्रा रेतीबंदर येथील खाडीत आढळला आहे. मनसुख यांच्या संशयास्पद मृत्यूमुळे त्यांनी आत्महत्या केली की हत्या याचा शोध घेण्यासाठी हे प्रकरण आता दहशतविरोधी पथक (एटीएस) कडे सोपवण्यात आले आहे. दहशत विरोधी पथकाने मनसुख यांचा मृतदेह आढळला त्या ठिकाणी तपासणी केली तसेच त्यांच्या कुटुंबीयांचीही चौकशी केली आहे.

एटीएसचे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांचे पथकाने शनिवारी मनसुख यांचा मृतदेह मिळून आलेल्या ठिकाणी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली आहे. रविवारी (७ मार्च) दुपारी हे पथक मनसुख हिरेन यांच्या कुटुंबियांच्या भेटीला त्याच्या ठाण्यातील विकास पाम सोसायटी येथे दाखल झाले होते. एटीएसच्या पथकाने हिरेन कुटुंबियांची भेट घेतली आणि या तीन तासाच्या भेटीनंतर दुपारी साडेतीन वाजता एटीएसच्या पथक रवाना झाले. तीन तास सुरू असलेल्या चौकशीत मनसुख घरातून बाहेर पडल्यापासून ते कुणाकुणाला भेटत होते, त्यांना भेटण्यासाठी कोण येत होते, त्यांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तीची माहिती तसेच स्कॉर्पिओ कार संदर्भात माहिती विचारली असल्याचे त्याच्या कुटुंबातील एका सदस्याने ही माहिती दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : भाजप देशात जातीयद्वेषाचं विष पसरवतय, शरद पवारांची मोदींवर खोचक टीका


मनसुख यांच्यासंदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न एटीएसचे पथक करत आहे. यासाठी एटीएसच्या पथकाने मनसुखच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. एटीएसच्या पथकाने मनसुखची पत्नी आणि तीन मुले, भाऊ आणि नातेवाईकांची चोकशी केली आहे. तसेच मनसुख यांच्याबाबत अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. मनसुख यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन हे वसईतील असल्याचे समोर आल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.

- Advertisement -

पत्नीने केला गुन्हा दाखल

गृह विभाग,महाराष्ट्र शासन यांचे आदेशानुसार ठाणे शहर पोलीस यांचेकडून मनसुख हिरन यांच्या अकस्मात मृत्यू प्रकरणाचा तपास दहशतवाद विरोधी पथक यांच्याकडे वर्ग करण्यात आलेला आहे. त्याप्रमाणे दहशतवाद विरोधी पथकाने तपासाची सर्व कागदपत्रे मुंब्रा पोलीस स्टेशनकडून हस्तगत करून पुढील तपास सुरू केला आहे. त्यानुसार आज दिनांक ७ मार्च २०२१ रोजी गु. र. क्र. १२/२०२१ भा द वि कलम ३०२,२०१,३४,१२० B प्रमाणे मयत यांच्या पत्नी श्रीमती विमला मनसुख हिरन यांचे फिर्यादीवरून द वि प पोलीस स्टेशन मुंबई येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे. हत्या, पुरावा नष्ट करणे, कट रचणे सह या अनुषंगाने अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -