मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या भाडे तत्वावरील एका बसवरील चालकाने सोमवारी रात्रीच्या सुमारास बेदरकारपणे बस चालवत कुर्ला , सीएसटी रोड येथे रिक्षा आणि इतर वाहनांना जोरदार धडक दिली. या घटनेत रिक्षातील प्रवासी, काही पादचारी असे तब्बल 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बसचा ब्रेक फेल झाल्याने घटना घडल्याचे सांगण्यात येते. सदर जखमींना तातडीने नजीकच्या भाभा आणि सायन रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. मात्र अपघातानंतर बस चालकाने बस सोडून पळ काढल्याचे सांगण्यात येते. (Many injured in a horrific BEST bus accident in Kurla)
प्राप्त माहितीनुसार, बेस्ट उपक्रमाची कुर्ला ते अंधेरी या मार्गावर धावणाऱ्या बस क्रमांक 332 या भाडे तत्वावरील बसच्या चालकाचे रात्री 9.30 वाजताच्या सुमारास कुर्ला ( पश्चिम), आंबेडकर नगर, बुद्ध कॉलनी, महापालिका एल वार्ड कार्यालय, एस जी बर्वे मार्ग, अंजुमन ए इस्लाम शाळेसमोर एका रिक्षाला आणि आणखीन काही वाहनांना, पादचारी यांना जोरदार धडक दिली. बसचा ब्रेक फेल झाल्याने सदर दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येते.
हेही वाचा – Maharashtra EVM Issue : महाराष्ट्रातील ईव्हीएम, व्हीव्हीपॅटची आकडेवारी जुळली; निवडणूक आयोगाचे म्हणणे काय
धक्कादायक! कुर्ल्यात बेस्ट बस मार्केटमध्ये घुसल्याने मोठा अपघात; अनेकांना उडवलं
— आदित्य मालवणकर (@memalvanimanus) December 9, 2024
अचानकपणे घडलेल्या या अपघातात रिक्षाचा चक्काचूर झाला आहे. रिक्षातील प्रवासी, रिक्षा चालक आणि काही पादचारी असे किमान 20 जण गंभीर जखमी झाले. या सर्व जखमींना तातडीने तेथील नागरिकांनी नजीकच्या भाभा आणि सायन रुग्णालयात उपचार करण्यासाठी नेले. मात्र त्यापैकी 3 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत मृतांचा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र बेस्ट प्रशासनाकडून याबाबत अधिक खात्रीलायक माहिती मिळण्यात अडचण येत आहे. मात्र बेस्ट बसचा चालक मद्यधुंत अवस्थेत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. याप्रकरणी अपघाताचा तपास करण्यास पोलिसांनी सुरुवात केली असून बस चालकाला ताब्यात घेतले आहे.