घरमुंबईमराठा क्रांती मोर्चाचा निवडणुकीत कोणालाही पाठिंबा नाही

मराठा क्रांती मोर्चाचा निवडणुकीत कोणालाही पाठिंबा नाही

Subscribe

मराठा क्रांती मोर्चाने या निवडणुकीबाबत कोणत्याही राजकीय पक्षाला वा उमेदवाराला पाठींबा देण्याचा वा मतदान करण्याचा निर्णय घेतलेला नाही.

मराठा क्रांती मोर्चा लोकसभा निवडणुकीत कोणालाही पाठिंबा देणार नाही आहे. मराठा क्रांती मोर्चाने या निवडणुकीबाबत कोणत्याही राजकीय पक्षाला वा उमेदवाराला पाठींबा देण्याचा वा मतदान करण्याचा निर्णय घेतलेला नसल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वय समितीचे सदस्य अॅड. धनंजय जोगदंड यांनी आज दिली.

मराठा क्रांती मोर्चात दुफळी

दोन दिवसांपूर्वीच कल्याणमधील शिवसेनेचे पदाधिकारी अरविंद मोरे यांनी मराठा क्रांती मोर्चाने मराठा उमेदवारांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले होते. त्याच अनुषंगाने जिल्हास्तरीय बैठक बोलावून कोणत्याही पक्षाला वा उमेदवाराला पाठिंबा न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चात दुफळी असल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

निवडणुका येतील आणि जातील

दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील कोणत्याही उमेदवाराने मराठा क्रांती मोर्चाकडे पाठींबा मागितलेला नाही. त्यामुळे कुणालाही पाठींबा देण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाने घेतलेला नाही. कल्याण येथे सोमवारी झालेल्या बैठकीत उपस्थित सदस्यांनी निवडणुका येतील-जातील मात्र आपली एकजूट कायम राहावी, अशी भावना व्यक्त केल्या. याचा अर्थ स्पष्ट आहे की, कोणत्याही राजकीय पक्षाला वा उमेदवाराला पाठींबा देण्याचा निर्णय झालेला नाही, असेही जोगदंड यांनी सांगितले. ज्यांनी कोणत्याही उमेदवाराला पाठींबा देल्याचे वक्तव्य केले असेल, ते त्यांचे वैयक्तिक मत असेल अशी प्रतिक्रिया शाम आवारे यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -