घरमनोरंजनजगातील सर्वाधिक उंच शिवमंदिरात मराठमोळ्या अभिनेत्रीचा नृत्याविष्कार

जगातील सर्वाधिक उंच शिवमंदिरात मराठमोळ्या अभिनेत्रीचा नृत्याविष्कार

Subscribe

तुंगानाथ शिवमंदिरासमोर शिव वर्णम सादर करणारी मीरा जोशी ही पहिली अभिनेत्री ठरली आहे.

अभिनेत्री मीरा जोशी ही नेहमी तिच्या ग्लॉमरस फोटो आणि व्हिडिओमुळे चर्चेत येत असते. मात्र यावेळी ही मराठमोळी अभिनेत्री एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. मीराने जगातील सर्वाधिक उंचीवर असलेल्या तुंगानाथ शिवमंदिरात नृत्य आराधना करण्याचा नवा विक्रम केला आहे. तुंगानाथ शिवमंदिरासमोर शिव वर्णम सादर करणारी मीरा जोशी ही पहिली अभिनेत्री ठरली आहे. १६ मार्च रोजी पहाटे ३ वाजता तिने चंद्रशीला शिखरावर ट्रेकिंगला सुरुवात केली . ती सुर्योदयाच्या वेळी शिखरावर पोहचली त्याखालीच असलेल्या प्राचीन शिवमंदिरासमोर मीराने नृत्य सादर केले. हे नृत्य सादर करतनाचा एक व्हिडिओ तिने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमुळे मीराचे चाहत्यांकडून फार कौतुक होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Meera Joshi (@meerajoshi_)

 जगातील सर्वात उंचीवर असलेले हे तुंगनाथ शिवमंदिर उत्तराखंडच्या रुद्रप्रयोगमध्ये आहे. तुंगनाथ पर्वतावर असलेले हे शिवमंदिर ११ हजार ३८५ फूट उंचीवर आहे. मीराला अभिनयाबरोबर ट्रेकिंगची आवड आहे. तिच्या या नृत्यविष्काराची नोंद ‘हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ आणि ‘इंडिया रेकॉर्ड’ मध्ये झाली आहे. मीरा जोशीने या यशाचे श्रेय आईवडील आणि भावाला दिले आहे. याव्यतिरिक्त स्मित शाह, तुषार सुभेदार, चिंतन पांचाळ, आनंद बनसोडे या टीम सदस्यांचे आणि चाहत्यांचे आभार मानले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Meera Joshi (@meerajoshi_)

- Advertisement -

 या नृत्या विष्काराविषयी सांगताना मीरा जोशी म्हणाली की, मी भगवान शंकराची भक्त असून तुंगानाथ मंदिराला भेट द्याव हे माझे स्वप्न होते आणि ते आता साकार झाले आहे. मी ज्यावेळी येथे गेले त्या दिवशी मंदिर परिसरात बर्फ नव्हता. त्या संधीचा फायदा घेत मी नृत्य केले. खरे तर तापमान ६ डीग्रीपर्यंत होते. तिथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. भगवान शिवशंकराच्या आशीर्वादाने माझे स्वप्न पूर्ण झाले. अशा शब्दात मीराने तिचे मनोगत व्यक्त केले आहे.


हे वाचा- बॉलिवूड कोरोनाच्या कचाट्यात! विकी कौशलनंतर कतरिना कैफ कोरोना पॉझिटिव्ह

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -