घरताज्या घडामोडीडोंबिवलीत भाजपच्या क्रिकेट सामन्यात मराठी भाषिकांना 'नो एन्ट्री'

डोंबिवलीत भाजपच्या क्रिकेट सामन्यात मराठी भाषिकांना ‘नो एन्ट्री’

Subscribe

मराठमोळ्या डोंबिवलीत भाजपने भरविलेल्या क्रिकेट सामन्यात चक्क मराठी भाषिकांना नो एन्ट्री असल्याने डोंबिवलीत मराठी हा वाद चिघळला आहे.

सोनी सब टीव्हीवरील ‘तारक मेहताचा उलटा चष्मा’ या मालिकेचे मजेशीर पात्र जेठालालचे वडील बाबूजी यांच्या तोंडी ‘मुंबईची भाषा हिंदी’ असल्याचा संवाद दाखविण्यात आला आहे. या संवादावरून सोशल मीडियावर ताशेरे ओढले जात असून ही मालिका वादाच्या भोवऱ्यात सापडल्यानंतर पुन्हा एकदा मराठी हा वाद डोंबिवलीत चिघळणार असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे महाराष्ट्रातून मराठी भाषेचा आग्रह केला जात असतानाच, दुसरीकडे मराठमोळया डोंबिवलीत भाजपने भरविलेल्या क्रिकेट सामन्यात चक्क मराठी भाषिकांना नो एन्ट्री आहे. या स्पर्धेत केवळ मारवाडी आणि गुजराती भाषिकांनाच सहभाग घेता येईल, असा बॅनर लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे यावर डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांचा फोटोही छापला आहे. त्यामुळे भाजपची क्रिकेट स्पर्धा चांगलीच वादात सापडली आहे.

- Advertisement -

गुजराती समाजाच्यावतीने क्रिकेटचे सामने

युवा आशापुरा मित्र मंडळ यांच्यावतीने नमो रमो ट्रॉफी २०२० या अंडरआर्म ओपन टूर्नामेंटचे आयेाजन करण्यात आले आहे. हा क्रिकेट सामना फक्त गुजराती, कच्छी आणि मारवाडी भाषिक समाजासाठी असल्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. मराठी संस्कृती जपणाऱ्या मराठमोळया शहरात मराठी भाषिकांना एन्ट्री नसल्याने मराठी भाषिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. दरम्यान, बॅनरवर आमदार रविंद्र चव्हाण यांचा फोटा छापण्यात आला असला तरी सुध्दा हे भाजपने क्रिकेटचे सामने भरविलेले नाही. गुजराती समाजाच्यावतीने क्रिकेटचे सामने भरविण्यात आल्याचा खुलासा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केला.


हेही वाचा – मुंबईची भाषा हिंदी? जेठालाल बरळले


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -