खालच्या जातीची असल्याचे सांगून विवाहाला विरोध; प्रियकाराविरोधात महिला पोलिसाची तक्रार

rape

 

कल्याणः तू खालच्या जातीची आहेस, असे सांगून विवाहास नकार देणाऱ्या प्रियकाराविरोधात महिला पोलिसाने कल्याण पोलिसांत तक्रार केली आहे. पोलीस याचा अधिक तपास करत आहेत. पीडित महिला पोलीस मुंबई पोलीस दलात कार्यरत आहे. तर बलात्काराचा आरोप असलेला तरुण लष्कारात कार्यरत आहे.

आकाश जयधर घुले या तरुणाविरोधात ही तक्रार करण्यात आली आहे. पीडितेची आणि आकाशची इंस्टाग्रामवर ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रित झाली. नंतर दोघांचे प्रेमसंबंध जुळले. त्यांच्यात शरीरसंबंधही झाले. पुढे जाऊन आकाशने विवाहास नकार दिला. त्यामुळे पीडितेने कल्याण पोलिसांत याची तक्रार दिली. आकाशने जातीचे कारण देऊन विवाहास नकार दिल्याचा दावा पीडितेने तक्रारीत केला आहे.

आकाश हा मुळचा बीडचा आहे. तो लष्कराच्या पुणे खडकी येथील बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपच्या डी. आय. विभागात प्रशिक्षक म्हणून काम करतो. दोन वर्षांपूर्वी पीडितेसोबत आकाशची ओळख झाली. पीडिता आदिवासी समाजाची आहे. तसे तिने आकाशला सांगितले होते. तर आकाश हा वंजारी समाजाचा आहे.

पीडिता आणि आरोपी यांच्यात दोन वर्षापूर्वी इन्स्टाग्रामच्या माध्यामातून ओळख झाली होती. या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर वारंवार बलात्कार केला. मात्र, आता आरोपीने जातीचा प्रश्न उपस्थित करत लग्नास नकार दिला, असे पाडिताने तक्रारीत म्हटले आहे. विवाहाचे अमिष दाखवून आकाशने पीडितेसोबत एक वर्ष शरीरसंबंध ठेवले होते.

मात्र आकाशचा भाऊ राजेश घुलेने पीडितेशी संपर्क केला. आकाश दुसऱ्या मुलीसोबत विवाह करणार आहे, असे राजेशने पीडितेला सांगितले. राजेश खोटे बोलतो आहे, असे आकाशने पीडितेला सांगितले. त्यानंतर पीडिता कुटुंबीयांसोबत आकाशच्या बीडमधील केळगाव येथील घरी पोहोचली. त्यावेळी तेथे आकाशचे कुटुंबीय व त्यांची पंच समिती उपस्थिती होती. आपल्या विवाहाला विरोध असल्याचे आकाशने पीडितेला सांगितले. तू खालच्या जातीची असल्याने आपला विवाह होणार नाही, असेही आकाश पीडितेला बोलला. पीडितेने पोलिसांत याची तक्रार केली आहे. पोलीस याचा तपास करत आहेत.