घरमुंबईकरी रोडमधील अविघ्न टॉवरमध्ये अग्नितांडव; आयुक्त, महापौरांचे दोषींवर कडक कारवाईचे आश्वासन

करी रोडमधील अविघ्न टॉवरमध्ये अग्नितांडव; आयुक्त, महापौरांचे दोषींवर कडक कारवाईचे आश्वासन

Subscribe

मुंबईतील करीरोड स्टेशन जवळील एका रहिवासी इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. वन अविघ्न पार्क असं या इमारतीचे नाव असून इमारतीच्या १९ मजल्यावर आग लागल्य़ाची माहिती समोर आली होती. अग्निशमन दलाच्या १५ गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले आहे. मात्र या आगीतून जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असताना एक व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. १९ व्या मजल्यावर फर्निचरचं काम सुरु होतं. त्यावेळी आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पण यावर अजून शिक्कामोर्तब झालेलं नाही. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि मुंबई आयुक्त इक्बाल चहल यांनी घटनास्थळी धाव घेत सर्व घटनेची पाहणी केली. तसेच दोषींविरोधात कडक कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.

इमारतीमधील अश्निशमन यंत्रणाच बंद – महापौर किशोरी पेडणेकर

अविघ्न इमारतीच्या सिक्युरिटीकडे १५ मिनिट होती, त्या १५ मिनिटात गाद्या टाकल्या असत्या तर राम तिवारी नामक व्यक्तीचा जीव वाचवू शकले असते. अग्निशमन दलाचे जवान पोहचताच लगेच आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरु केले, अनेक लोकांना बाहेर काढलेलं आहे. अद्यापही दोन जण अडकल्याचे सांगितले जात आहे. त्या व्यक्तींची कोणत्या परिस्थिती आहे याची माहिती नाही. अद्याप परिसरत धूराचे लोट पसरले आहेत. ही ४ लेवलची आग असल्याचे सांगितले जात आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. व्यक्तीच्या मृत्यूवरून अग्निशमन दलाच्या जवानांवर आरोप करणं चुकीचे आहे. या इमारतीमधील अश्निशमन यंत्रणाच बंद होती. याप्रकरणात कडक कारवाई केली जाईल. असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.

- Advertisement -

दोषींविरोधात कडक कारवाई करु – आयुक्त इक्बाल चहल

या दु्र्दैवी घटनेचा दोन भागांत विचार केला पाहिजे. पहिला भाग म्हणजे तातडीने ही आग विझवायची आहे. आणि त्यानंतर इमारत अनधिकृत होती की अधिकृत होती याची चौकशी होईल. ११. ५२ मिनिटांनी आम्हाला घटनेची माहिती मिळाली होती. त्यानंतर लगेच पालिकेची यंत्रणा घटनास्थळी पोहचली. १९ व्या मजल्यावर ही आग लागली होती. त्यानंतर २० व्या मजल्यापर्यंत पसरत गेली. आत्ता आगीवर नियंत्रण मिळाले आहे. आमचे अधिकारी आता १९ आणि २० मजल्यावर उपस्थित आहेत. पालिकेचा पहिला उद्देश आहे की, आणि काही घटना घडू नये आणि ही आग संपूर्णपणे विझली पाहिजे. यात अरुण तिवारी ३० वर्षीय व्यक्तीचा १९ व्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झाला आहे. केईएम रुग्णालयाने त्याला मृत्य घोषित केले आहे. या इमारतीमध्य़े काही अनधिकृत बांधनकाम झालं असल्यास त्याची चौकशी होईल. कडक कारवाई करण्यात येईल. असं आश्वासन मुंबई महानगरपालिकेचे आय़ुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिलं आहे.


करीरोडच्या अविघ्न पार्कला भीषण आग, एकाचा मृत्यू


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -