घरताज्या घडामोडीदादरमध्ये 15 मजली इमारतीला भीषण आग; 60 वर्षीय व्यक्तीचा गुदमरुन मृत्यू

दादरमध्ये 15 मजली इमारतीला भीषण आग; 60 वर्षीय व्यक्तीचा गुदमरुन मृत्यू

Subscribe

दादर येथील हिंदू कॉलनी परिसरात असलेल्या १५ मजली इमारतीच्या १३ व्या मजल्यावर आग लागली. या आगीत ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इमारतीला आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक पोलीस दाखल झाले.

दादर येथील हिंदू कॉलनी परिसरात असलेल्या १५ मजली इमारतीच्या १३ व्या मजल्यावर आग लागली. या आगीत ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इमारतीला आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक पोलीस दाखल झाले. सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. (Massive fire breaks out in 15-storey building in Dadar Death of a 60 year old man vvp96)

मिळालेल्या माहितीनुसार, दादर पूर्वे येथील हिंदू कॉलनीत असलेल्या रेन्ट्री या 15 मजली इमारतीच्या 13 व्या मजल्यावर भीषण आग लागली. शनिवारी सकाळी ८:३७ वाजताच्या सुमारास ही आग लागली. ही आग इतकी भीषण होती की, आग लागलेल्या निर्माण धुरात श्वास गुदमरल्याने सचीन पाटकर या 60 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

या घटनेतील जखमी व्यक्तींना सायन रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत शर्तीच्या प्रयत्नांवर बचावकार्य सुरू केले. मात्र या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

दरम्यान, शुक्रवारी मुंबईतील जोगेश्वरी पश्चिमेला असलेल्या हिरापन्ना मॉलमध्ये भीषण आग लागली होती. शुक्रवारी दुपारी ३.१५ वाजताच्या सुमारास ही आग लागली होती. ही आग इतकी भीषण आहे की धुराचे लोट दूरवरुनही दिसत होते. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या १२ गाड्या पोहोचल्या होत्या. मॉलमधून मोठ्या प्रमाणात आगीच्या धुराचे लोट बाहेर येत होते.

- Advertisement -

हेही वाचा – मुसळधार पावसाने नागपूरला धुतले, अनेक भागात पाणीच पाणी; फडणवीसांनीही घेतली दखल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -