घरमुंबईधारावी झोपडपट्टीत पहाटे लागली भीषण आग; ५० पेक्षा अधिक घरे-कारखाने जळून खाक

धारावी झोपडपट्टीत पहाटे लागली भीषण आग; ५० पेक्षा अधिक घरे-कारखाने जळून खाक

Subscribe

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी येथे आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली धारावी येथे असलेल्या शाहू नगरमधील कमला नगर येथे ही आग लागली. या आगीच्या भक्षस्थानी आलेली २५ पेक्षा अधिक घरे जाळून राख झाली आहेत. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानीन झालेली नाही.

धारावी झोपडपट्टी ही आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून प्रसिद्ध आहे. धारावी येथे असलेल्या शाहू नगर परिसरातील कमला नगरमधील काही घरांना आज पहाटेच्या वेळी ४ वाजता आग लागली. या आगीमध्ये २५ पेक्षा अधिक घरे जाळून राख झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर २० ते २५ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाने तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवले आहे. सुदैवाने या आगीत जीविताहिनी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

धारावीत असलेल्या शाहू नगरमधील कमला नगर हा अत्यंत दाटीवाटीचा परिसर आहे. या परिसरात अनेक लहान आणि गल्लीबोळ्यात असलेली घरे आहेत. ज्यामुळे आग लागल्यानंतर ती आटोक्यात आणण्यासाठी अनेक शर्थीचे प्रयत्न करावे लागले. कमला नगर परिसरात काही लेदरची आणि प्लास्टिकचे सामान असलेली दुकाने तसेच कपड्यांचे कारखाने देखील आहेत. ज्यामुळे आग लागण्याच्या काही वेळातच ही आग वाढत गेली. दरम्यान, ही आग लागताच शाहू नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि या परिसरातील नागरिकांना घराच्या बाहेर काढले. ज्यामुळे मोठा अनर्थ टाळला.

- Advertisement -

हेही वाचा – महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा सर्वोच्च न्यायालयात आज सलग दुसरा दिवस

दरम्यान, ही आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामन दलाच्या २० ते २५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. परंतु या परिसरातील रस्ते अत्यंत दाटीवाटीचे आणि अरुंद असल्याने अग्निशमन दलाला या आगीवर नियंत्रण मिळविताना मोठेप्रयत्न करावे लागले. पण अखेरीस ३ तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाला या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. यानंतर अग्निशमन दलाकडून आग लागलेल्या भागात फायर कुलींगचे काम सुरु करण्यात आल्याची माहिती शाहू नगर पोलिसांकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

धारावीतील वाहतुकीत बदल
धारावी कमला नगर येथे लागलेल्या भीषण आगीनंतर या परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आल्याची माहिती मुंबई वाहतूक पोलिसांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. आगीमुळे 90 फीट रोड बंद करण्यात आला असून वाहतूक संथ गतीने रोहिदास मार्गाकडे वळवण्यात आली आहे. टी जंक्शनपासून 60 फीट रोडवर जाण्याऐवजी रहेजा माहीमकडे वाहतूक वळवण्यात आली आहे. तसेच या भागातून बीकेसी येथे जाणारा रस्ता सुद्धा बंद करण्यात आलेला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -