घरक्राइममास्तर, हे बरं नव्हं : निलंबनाच्या रागातून प्राध्यापकांचा मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरूंवर हल्ला

मास्तर, हे बरं नव्हं : निलंबनाच्या रागातून प्राध्यापकांचा मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरूंवर हल्ला

Subscribe

जागतिक स्तरावर ओळख असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची धुरा कधीकाळी डॉ. अशोक प्रधान यांच्याकडे होती

मुंबई : शिक्षक, प्राध्यापकांच्या हाती देशाच्या भावी पिढीचे भवितव्य असते. त्यामुळेच शिक्षक, प्राध्यापकांना त्यांचे व्यक्तीमत्वही आदर्शवत असेच ठेवावे लागते. परंतू हेच शिक्षक, प्राध्यापक हाणामारीवर आले तर! आश्चर्य वाटेल ना. हो पण हे खरं आहे अगदी उच्च शिक्षित असलेल्या प्राध्यापकांनी मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरूंच्या घरात घुसून हल्ला केला. यामध्ये माजी कुलगुरू गंभीर जखमी झाले असून, तक्रारीनंतर मारहाण करणाऱ्या प्राध्यापकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Master it was not good Professors attack ex Chancellor of Mumbai University in anger over suspension)

जागतिक स्तरावर ओळख असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची धुरा कधीकाळी डॉ. अशोक प्रधान यांच्याकडे होती. मात्र याचवेळई डॉ. अशोक प्रधान यांच्याकडे चार वर्षांपूर्वी शैक्षणिक संस्थेतील हल्ला करणाऱ्या प्राध्यापकांविरोधात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीवरून डॉ. प्रधान यांनी चार वर्षापूर्वी त्या प्राध्यापकांना निलंबित केले होते. याच निलंबनाचा राग मनात असलेल्या प्राध्यापकांनी थेट माजी कुलगुरू डॉ. अशोक प्रधान यांचे निवासस्थान गाठून त्यांच्यावर हल्ला केला. ही घटना कल्याण पश्चिम भागातील कर्णिक रोडवरील कुलगुरुंच्या ही घटना घडली आहे. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात हल्लेखोरांविरोधात विविध कलामानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : दोन वर्षांपूर्वी थोडक्यात संधी हुकली, पण अखेरिस वीर दासने आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार मिळवलाच

या आरोपींनी केला माजी कुलगुरूंवर हल्ला

मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अशोक प्रधान यांच्या घरात घुसून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. हल्ला करणाऱ्यांमध्ये निलंबित प्राध्यापक संजय जाधव (50), त्याचा साथीदार संदेश जाधव (32), एक अल्पवयीन आणि एका महिलेसह दोन अनोळखी पुरुष अशी आरोपींची नावे आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : कुर्ल्यात सुटकेसमध्ये सापडलेल्या ‘त्या’ महिलेच्या हत्येचे गूढ उलगडले

निलंबित प्राध्यापकांवर गैरवर्तन आणि अनैतिक कामाचा ठपका

मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अशोक प्रधान हे मुंबई विद्यापीठातून सध्या निवृत्त झाले आहेत. ते सध्या दुसऱ्या शिक्षण समितीचे पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. डॉ. प्रधान यांनी चार वर्षांपूर्वी त्या शैक्षणिक संस्थेतील हल्लेखोर प्राध्यापकाचे गैरवर्तन आणि अनैतिक कामाबद्दल संस्थेच्या अनेक शाखांनी तक्रारी केल्यामुळे त्यांना कामावरून निलंबित केले होते. त्यामुळे प्राध्यापकाचे वेतन घेणाऱ्या आरोपीचे वेतन बंद झाल्याने त्यांना आर्थिक फटका बसला होता. या आर्थिक कोंडीतून त्या निलंबित प्राध्यापकांनी डॉ. प्रधान यांच्यावर हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -