‘मातोश्री’ने दूर केली खैरे – सत्तार यांच्यातील नाराजी

शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यातील वाद मिटवण्यासाठी 'मातोश्री'ला यश आले आहे.

matoshree meeting ends chief minister uddhav thackeray orders work together abdul sattar chandrakant
खैरे - सत्तार यांच्यातील नाराजी

मागील दोन दिवस शिवसेनेच्या दोन नेत्यांच्या नाराजीमुळे राजकीय रामायण घडले त्या दोन्ही नेत्यांचे मनोमिलन घडवून आणण्यात ‘मातोश्री’ ला यश आले असून, खुद्द मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांना खैरे आणि सत्तार यांच्यामधील वाद मिटवण्यासाठी मध्यस्ती करावी लागली आहे. शिवसेनेचे नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यातील वाद मिटवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बैठक बोलवावी लागली. अखेर उद्धव ठाकरे यांनी या दोन्ही नेत्यांना समजवल्यानंतर या दोन्ही नेत्यांनी हातात हात मिळवले. एवढेच नाही तर भविष्यात पक्षाच्या चौकटीतच राहून काम करू, असे देखील या दोन्ही नेत्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. या दोन्ही नेत्यामधील वाद मिटवण्यासाठी बोलावण्यात आलेल्या या बैठकीला शिवसेना नेते आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर, आमदार अंबादास दानवे यांची उपस्थिती होते.

दरम्यान, यावेळी एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, दोघांमध्ये जे गैरसमज होते ते दूर झाले. अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला ही अफवा होती. आज मुख्यमंत्र्यांच्या समोर सगळ्या गोष्टीवर पडदा पडलेला आहे. तसेच इथून पुढे पक्ष शिस्त आणि पक्षाचा आदेश मानून पक्षाने जी चौकट आखून दिली आहे. त्यामध्ये काम करा, असे देखील यावेळी सांगण्यात आले. तसेच चंद्रकांत खैरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश मान्य केला आहे. तर अब्दुल सत्तार यांनी देखील पक्षप्रमुखांना शब्द दिला असून, आमच्याकडून तुम्हाला त्रास होईल, असे काम कुठल्याही परिस्थितीत होणार नाही, असे त्यांनी सांगितले.

खैरे साहेब आणि माझ्यामध्ये गैरसमजातून ज्या गोष्टी झाल्या त्या यापुढे होणार नाही. जो निर्णय मातोश्रीवरून येईल त्याचे तंतोतंत पालन करीन. यानंतर अशा पद्धतीचा वाद होणार नाही याची दक्षता आम्ही घेऊ. – अब्दुल सत्तार, राज्यमंत्री

वाद हा मिटलेला आहे. बरीच चर्चा झाली. अब्दुल सत्तार माझे मंत्री आहेत. मी शिवसेनेचा नेता आहे. त्याच्यामुळे शिवसेनेचे नियम आणि शिस्त आम्ही सगळे व्यवस्थित पाळू. आमच्या पुढच्या निवडणुकीत आम्ही हातात हात घालून काम करु. – चंद्रकांत खैरे, माजी खासदार शिवसेना


हेही वाचा – मनसेचे सर्व पर्याय खुले; ‘आपलं महानगर’च्या बातमीवर शिक्कामोर्तब