घरताज्या घडामोडीमनसेचे सर्व पर्याय खुले; 'आपलं महानगर'च्या बातमीवर शिक्कामोर्तब

मनसेचे सर्व पर्याय खुले; ‘आपलं महानगर’च्या बातमीवर शिक्कामोर्तब

Subscribe

शिवसेनेने मित्रपक्ष असलेल्या भाजपची साथ सोडली असून महाविकास आघीडीमुळे विरोधी पक्षाचा स्पेस भरुन काढण्याचा प्रयत्न मनसे करत आहे.

स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी म्हणजेच २३ जानेवारी रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या झेंड्याचा रंग आणि राजकीय भूमिका बदलणार असल्याची बातमी सर्वात आधी ‘आपलं महानगर’ने दि. ५ जानेवारी रोजी दिली होती. त्यानंतर आज मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, “भविष्यात मनसेपुढे कुणाशी युती करायची सर्व पर्याय खुले असून त्याबाबत राज ठाकरे निर्णय घेतील.”

झेंड्यांचा रंगही भगवा किंवा केशरी

- Advertisement -

महाराष्ट्र विधानसभा २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकांमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना त्यांच्या पक्षाचा फक्त एकच आमदार निवडून आणण्यात यश आले. त्यामुळे आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेऊन पुढची राजकीय खेळी खेळणार असल्याची चर्चा रंगलेली आहे. त्याचसोबत आता मनसेच्या झेंड्यांचा रंगही भगवा किंवा केशरी, असा करण्यात येणार आहे, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून ‘आपलं महानगर’ला मिळाली आहे. याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वत: ते जाहीर करतील अशी चर्चा मनसेच्या वर्तुळात सुरु आहे. याबाबत बोलताना मनसे नेते बाळा नांदगावकर यांनीही संकेत दिले आहेत.

शिवसेनेला आम्ही मदत केली

- Advertisement -

याआधी आम्ही शिवसेनेला मदत केली, भाजपाला मदत केली आहे आणि कॉंग्रेस – राष्ट्रवादीलाही मदत केली आहे. तसेच आम्हाला कोणी मदत केली हे देखील सर्वांना माहित आहे. त्यामुळे भविष्यात कोणासोबत जायचे न जायचे हा निर्णय पक्षप्रमुख राज ठाकरे घेतील. त्यासोबतच कोणताही पक्ष एकमेकांचा शत्रू नसतो, त्यामुळे जे लोकांच्या मनात आहे ते घडताना दिसत आहे, असे सांगत त्यांनी भाजप – मनसे एकत्र येऊ शकतात, असे संकेत दिले आहेत.

मात्र, ज्या पक्षाचा भूतकाळ आणि वर्तमान पाहता सध्या ही चर्चा नाही. मात्र, भविष्यात काहीही होऊ शकते. समविचारी पक्षांनी एकत्र येण्यास काय अडचण नाही. भाजपा आणि मनसेची विचारधारा सध्या वेगळी आहे. कार्यकर्त्यांमध्ये विसंगती आहे. त्यामुले भविष्यात मनसेची ध्येय धोरणे बदलली तर काहीही होऊ शकते.  – राम कदम, भाजप आमदार


हेही वाचा – मनसेच्या झेंड्याचा रंग बदलणार!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -