घरताज्या घडामोडीगीता पठणाच्या मुद्द्यावरून महापौर म्हणाल्या, 'तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवू नका, बोंबलून सांगण्यासारखे...

गीता पठणाच्या मुद्द्यावरून महापौर म्हणाल्या, ‘तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवू नका, बोंबलून सांगण्यासारखे हिंदुत्व नाही’

Subscribe

महापौर किशोरी पेडणेकर यांनी गीता पठणाच्या मुद्द्यावरून भाजपला चांगलंच फटकारलं आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी हिंदू राष्ट्र असलेल्या आपल्या देशात भगवद्गीतेच्या पठणाला असा विरोध होणे दुर्दैवी आहे. आपल्या शाळांमध्ये भगवद्गीतेच पठण करायचे नाही, मग फतवा-ए-आलमगिरीचे पठण झाले पाहिजे का? असा सवाल केला होता. याचे उत्तर देताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या का, हा तर म्हणजे कळस आहे, कशाचा कळस आहे तो तुम्ही ओळखा. मुळात गीता पठणाचा प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. कारण नसताना लहान मुलांमध्ये ते राजकारण आणल जातंय. हिंदुत्व काय असतं ते आम्हाला शिकवू नका. हिंदुत्व हे सारखं तोंडाने बोंबलून सांगण्यासारखे नाही.

नक्की काय म्हणाल्या महापौर?

‘हा तर म्हणजे कळस आहे, कशाचा कळस आहे तो तुम्ही ओळखा. मुळात गीता पठणाचा प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. कारण नसताना लहान मुलांमध्ये ते राजकारण आणतायत. गीता ही सर्वोच्च आहे. ज्यावेळेला मी मधल्या पॅसेजमध्ये होते, त्यावेळेला गीता कोळी माझ्याकडे धावत धावत मागे आल्या. गीता घ्या, गीता घ्या, मी गीता आणली आहे, असे म्हणाल्या. अर्थातच त्या गीतेच उच्च स्थान आमच्या हृदयात नव्हे तर आमच्या कर्मात आहे. म्हणून मी त्या मधल्या पॅसेजमध्ये नमस्कार केला आणि त्यानंतर ग्रंथ घरी घेऊन गेले. त्यामुळे कुठलाही प्रस्ताव अद्याप महानगरपालिकेच्या पटलावर नसतानाही चर्चा करणे योग्य नाही. याचे राजकारण करण्यासाठी लहान मुलांनाही सोडले जात नाही. या राजकारणातून तुम्ही नक्की तरुण पिढीला काय संस्कार देताय हे कळतंय. त्यामुळे या गोष्टीवर यानंतर मी बोलणार नाही. प्रस्तावाच आला नाही, फक्त पत्र दिलं, फोटो काढले आणि व्हायरल केले, अशा पद्धतीने चर्चेत राहतायत,’ असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

- Advertisement -

पुढे किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, ‘गीता पठणाबाबत शिवसेनेच्या भूमिकेच आम्ही नंतर सांगू, आता गरज नाही. तुम्ही आम्हाला प्रस्ताव दिलेला नाही. कारण नसताना हिंदू मुस्लिम वाद तयार करायचा. सतत याच्यावर कारण नसताना बोलत राहायचं. काँग्रेसमध्ये गेले होते, तेव्हा मांडीला मांडी लावून बसले होते. त्यामुळे तुम्ही आम्हाला शिकवू नका हिंदुत्व काय आहे? हिंदुत्व सतत तोंडाने बोंबलून सांगण्यासारखं नाही. हिंदुत्व हे मानणारं हिंदुत्व आहे. मुंबई, महाराष्ट्राला आणि देशाला अस्थिर करण्यासारखं हिंदुत्व नाही, हिंदुत्व हे स्थिर आहे. प्रत्येकाच्या धर्माचा आदर करायचा हे आपल्याला आई-वडिलांसहित गुरुजनांसहित सर्वांनी शिकवलं आहे.’


हेही वाचा – राणेंच्या अधीश बंगल्यावर महापालिकेचे पथक दाखल; नारायण राणे पालिकेला सहकार्य करतील, महापौरांचा विश्वास

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -