घरताज्या घडामोडीBEST अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी १०,१०० रुपये बोनस जाहीर!

BEST अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी १०,१०० रुपये बोनस जाहीर!

Subscribe

बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना १५ हजार ५०० रुपये बोनस जाहीर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी बेस्टच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी देखील बोनसची घोषणा केली आहे. BEST मधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना १० हजार १०० रुपये इतके सानुग्रह अनुदान मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज भायखळ्यातील महापौर निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर केले. बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर बेस्टमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळावे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ३ नोव्हेंबर २०२० रोजी सायंकाळी वर्षा निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत बेस्टच्या कर्मचारी युनियनसोबत सकारात्मक चर्चा झाली होती. कोरोना काळात बेस्टमधील कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना ने-आण करण्याचे महत्वपूर्ण काम केले असल्यामुळे त्यांना सानुग्रह अनुदान मिळाले पाहिजे या भूमिकेतून बेस्टसाठी बोनस जाहीर करण्यात आला आहे.


हेही वाचा – मुंबई पालिकेच्या १५,५०० बोनसवर कामगार नाराज, हवे होते १७ हजार!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -