घरताज्या घडामोडीकेईएममधील 'त्या' डॉक्टरांचा महापौरांच्या हस्ते सत्कार

केईएममधील ‘त्या’ डॉक्टरांचा महापौरांच्या हस्ते सत्कार

Subscribe

रुग्णांवर हात व मूत्रपिंड प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया डॉक्टरांचा सत्कार

केईएम रुग्णालयात दोन रुग्णांवर हात व मूत्रपिंड प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांचा महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते शनिवारी सत्कार करण्यात आला. या सत्कारामुळे ते डॉक्टर भारावून गेले. तसेच, त्यांना आपल्या पुढील कर्तव्यासाठी एकप्रकारे प्रोत्साहन मिळाले.केईएम रुग्णालयात एका अपघातात हात गमावलेल्या २१ वर्षीय तरुणावर ब्रेन डेड व्यक्तीला एका भीषण अपघातात आपला एक हात गमवावा लागला होता. सुदैवाने, एका ब्रेन डेड व्यक्तीचा हात कापून त्या तरुणावर प्रत्यारोपित करण्याची शस्त्रक्रिया २४ तासांत अथक प्रयत्नानंतर निर्विघ्नपणे पार पाडण्यात केईएम रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले आहे.

केईएम रुग्णालयात एका २१ वर्षीय तरुणाला त्याचा हात अपघातात गमवावा लागल्याने त्याला कृत्रिम हात अथवा एखाद्या अवयव दान इच्छुक व्यक्तीचा जिवंत हात अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेद्वारे बसविण्याची नितांत आवश्यकता होती. त्यानुसार केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख व रुग्णालयातील प्लास्टिक सर्जरी विभागाच्या डॉ. विनिता पुरी यांच्या टीमने हात प्रत्यारोपण करण्यासाठी आवश्यक ते सर्व नियोजन केले. त्यानुसार त्या तरुणावर हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याची सर्व तयारी करण्यात आली. अखेर ११ ऑगस्ट रोजी पहाटे ४ ते १२ ऑगस्ट पहाटे ४ अशा २४ तासांच्या अथक प्रयत्नांनी रुग्णालयातील डॉक्टरांनी सदर शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली.त्यामुळे त्या तरुणाला एकप्रकारे दिव्यांग होण्यापासून केईएम रुग्णालयातील डॉक्टरांनी वाचविले. त्याचप्रमाणे आणखीन एका रुग्णावर मूत्रपिंड प्रत्यारोपित करण्याची शस्त्रक्रियाही डॉक्टरांनी यशस्वीपणे पार पाडली. या दोन्ही चांगल्या घटनांची दखल घेऊन महापौर किशोरी पेडणेकर यांनी, केईएम रुग्णालयातील त्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांना लालबागच्या गणेश मूर्तीची प्रतिकृती भेट देऊन सत्कार करण्यात आला.

- Advertisement -

अवयव दानाबाबत दानशूरपणा वाढावा -: महापौर

केईएम रुग्णालयातील दोन रुग्णांवर एकाच वेळी अवयव प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. यामध्ये एका रुग्णाला उजवा हात प्रत्यारोपण करण्यात आला तर दुसऱ्या रुग्णाला मूत्रपिंड (किडनी) ही प्रत्यारोपण करण्यात आली. उजवा हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ही जवळपास २४ तास चालली. अवयवदान प्रत्यारोपणाचे मुंबईत दोन परवानाधारक रुग्णालय असून त्यापैकी केईएम हे एकमेव शासकीय रुग्णालय असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

एका रुग्णाला उजवा हात प्रत्यारोपण करण्याची शस्त्रक्रिया केईएम रुग्णालयात प्रथमच करण्यात आली असून या सर्व डॉक्टरांचा आम्हाला अभिमान असल्याचे महापौरांनी सांगितले. मात्र अवयव दान करणाऱ्यांमध्ये दानशूरपणा वाढावा हा संदेश या शस्त्रक्रियेतून मिळाला असल्याचेही महापौरांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – केंद्र सरकारच्या ‘त्या’ IT नियमाला मुंबई हायकोर्टाकडून स्थगिती

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -