घरमुंबईअखेर रखडलेल्या ट्रामला महापौरांकडून 'ग्रीन सिग्नल'

अखेर रखडलेल्या ट्रामला महापौरांकडून ‘ग्रीन सिग्नल’

Subscribe

पर्यावरण व पालक मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडूनच फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात 'ग्रीन सिग्नल' देण्यात येणार होता. मात्र तारखेचे आणि वेळेचे गणित न जमल्याने अखेर कोणताही गाजावाजा न करता या ट्रामलक 'ग्रीन सिग्नल' देण्यात आला.

मुंबईच्या इतिहासाचा ठेवा असलेल्या मात्र भाटिया गार्डनमध्ये लोकार्पणाच्या प्रतिक्षेत एक – दीड वर्षे खितपत पडलेल्या ट्रामला महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते आज ‘ग्रीन सिग्नल’ देण्यात आला. पर्यावरण व पालक मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडूनच फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात ‘ग्रीन सिग्नल’ देण्यात येणार होता. मात्र तारखेचे आणि वेळेचे गणित न जमल्याने अखेर कोणताही गाजावाजा न करता या ट्रामलक ‘ग्रीन सिग्नल’ देण्यात आला.  मुंबईसह देशावर बरीच वर्षे राज्य करणाऱ्या ब्रिटिश राजवटीत मुंबईत जलद वाहतुकीचे साधन म्हणून अगोदर घोड्याला जोडलेली ट्राम मुंबईत धावली. नंतर विजेवरील ट्राम धावली. या दोन्ही ट्रामचा मनमुराद आनंद मुंबईकरांनी लुटला होता. मात्र नंतर काळाच्या ओघात बेस्टमध्ये बस गाड्या आल्या आणि ट्रामचे अस्तित्व संपुष्टात आले. ३१ मार्च १९६४ रोजी मुंबईत शेवटची ट्राम बोरबंदर ते दादर अशी धावली आणि पुढे ती इतिहास जमा झाली.

पुढे मुंबईत रस्ते खोदकाम करताना ट्रामचे त्या काळातील लोखंडी रूळ आढळून आले. त्यापैकीच रुळाचा काही भाग जतन करून ठेवण्यात आला. तर लोकप्रतिनिधीच्या मागणीवरून बेस्टने कोलकत्ता येथून एका ट्रामचे अवशेष मुंबईत आणले. त्यावर १६ लाख रुपये खर्चून व त्याची डागडुजी करून ही ट्राम पुढे सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या बाजूच्या भाटिया गार्डनमध्ये दर्शनीय ठिकाणी ठेवण्यात आली. तत्पूर्वी काही महिने ही ट्राम बेस्टच्या आणिक आगारात खितपत पडली होती. मुंबईत गेल्या मार्च २०२० पासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने जवळजवळ एक दीड वर्षे ही ट्राम लोकार्पणाच्या प्रतिक्षेत खितपत पडली होती.

- Advertisement -

त्यानंतर जेव्हा मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे पाहून २८ जानेवारी रोजी पर्यावरण मंत्री व पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते यक ट्रामला ‘ग्रीन सिग्नल’ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्यावेळी मंत्री महोदय यांच्या कार्यक्रमाचे व वेळेचे गणित न जमल्याने सदर कार्यक्रम पुढे फेब्रुवारी २०२१ मध्ये पहिल्याच आठवड्यात घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र त्यावेळीही त्यांचे गणित न जमल्याने अखेर आज घाईघाईत आणि सुमडीत या ट्रामचे लोकार्पण करण्यात आले.

मुंबईत देश, विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना व मुंबईकरांना आता या ट्रामला प्रत्यक्ष जवळून पाहता येणार आहे. कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गर्दी न करण्याचे केलेल्या आवाहनानुसार अत्यंत मोजक्या लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा पार पडला आहे. मुंबईचे गतवैभव मुंबईकरांना पुन्हा अनुभवता यावे या हेतूने बृहन्मुंबई महानगरपालिकेने ‘बेस्ट’ कडून ही ट्रॉम घेऊन भाटिया बागमध्ये बसविण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या ‘ए’ विभागाच्या वतीने या ट्रॉमचे नूतनीकरण व सुशोभिकरण करण्यात आले असून नागरिकांना बाहेरून ही ट्रॉम बघता येणार असल्याचे महापौरांनी सांगितले. तसेच या ट्रॉमध्ये संपूर्ण प्रकाशयोजना करण्यात आली असून त्याचे देखणे स्वरूप आता यापुढे मुंबईकरांना अनुभवता येणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – शिवतीर्थावर नाशिक पॅटर्न राबवा, राज ठाकरेंचे मुंबई महापालिकेला पत्र

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -