घरमुंबईकांजूरमार्ग येथील लस साठवणूक केंद्राचे महापौरांच्या हस्ते उदघाटन

कांजूरमार्ग येथील लस साठवणूक केंद्राचे महापौरांच्या हस्ते उदघाटन

Subscribe

आगामी पन्नास वर्षाची गरज पूर्ण करणारे लस साठवणूक केंद्र; लस साठवणूक क्षमता ही १ कोटी २० लाख

मुंबईत एकीकडे लसीचा तुटवडा जाणवत असताना दुसरीकडे १ कोटी २० लाख लसीचा साठा ठेवण्याची क्षमता असलेल्या कांजूरमार्ग येथील लस साठवणूक केंद्राचे महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत बुधवारी दुपारच्या सुमारास उदघाटन करण्यात आले. कांजूरमार्ग येथील महापालिकेच्या पाच मजली आरोग्य केंद्राच्या इमारतीतील तीन मजल्यांवर लस साठवणूक केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. या केंद्रामध्ये लसींचा १ कोटी २० लाख इतका साठा ठेवण्याची क्षमता आहे. या केंद्रामधूनच शहर, पश्चिम व पूर्व विभागातील लसीकरण केंद्रात लसीचा पुरवठा करणे सुलभ होणार आहे.

या उदघाटनपर कार्यक्रमाला, आरोग्य समिती अध्यक्षा प्रवीणा मोरजकर, ‘एस आणि टी’ विभागाच्या प्रभाग समिती अध्यक्षा दीपमाला बढे,स्थानिक नगरसेविका सुवर्णा करंजे, नगरसेविका सारिका पवार, जागृती पाटील, वैशाली पाटील, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे, सहाय्यक आरोग्य अधिकारी (लसीकरण विभाग) डॉ.शीला जगताप, डॉ.अविनाश अंकुश तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisement -

आगामी पन्नास वर्षांची गरज पूर्ण करणारे लस साठवणूक केंद्र – महापौर

या केंद्राबाबत अधिक माहिती देताना महापौराल किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, आगामी पन्नास वर्षांची गरज पूर्ण करणारे हे लस साठवणूक केंद्र आहे. मुंबईची महापौर म्हणून मला या केंद्र उभारणीचा अभिमान आहे.

कांजुरमार्ग (पूर्व) येथील परिवार संकुलात पाच मजली आरोग्य केंद्राच्या जागेत एक अत्याधुनिक लस साठवणूक केंद्र निर्माण करण्यात आले आहे. लसीचा साठा ठेवण्यासाठी तीन मजल्यांचा वापर करण्यात येणार आहे. साठवणूक केंद्रासाठी महानगरपालिकेतर्फे निश्चित करण्यात आले असल्याचे महापौरांनी सांगितले. या केंद्रात १ कोटी २० लाख लसींचा साठा करता येणार आहे, असे महापौरांनी सांगितले.

- Advertisement -

त्याचप्रमाणे, या केंद्रात ठेवण्यात येणाऱ्या लसीवर बाहेरील वातावरणाचा कुठल्याही प्रकारे परिणाम होऊ नये, यासाठी सदर जागेवर +२ डिग्री सेल्सियस ते +८ डिग्री सेल्सिअस तापमान राखत असलेले ४० क्युबिक मीटरचे दोन उपकरणे बसविण्यात आले आहे. त्यासोबतच – १५ डिग्री सेल्सिअस ते – २५ डिग्री सेल्सिअस तापमान राखत असलेले २० क्युबिक मीटरचे बसविण्यात आले असल्याचे महापौरांनी सांगितले. या केंद्रातील शितगृह हे सकाळी सौरऊर्जेवर व रात्री थेट वीजपुरवठावर चालविण्यात येणार असल्याने विजेची बचत होऊन पर्यावरणाला हातभार लागणार असल्याचे महापौरांनी सांगितले. तसेच अचानक वीज पुरवठा खंडित झाल्यास यासाठी प्रत्येक युनिट निहाय स्वतंत्र डीजे सेटची व्यवस्था करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -