घरताज्या घडामोडी'तीन-तीन वेळा इशारा देऊनही लोकं बाहेर निघायला तयार नाहीत'; मुंबईतील दुर्घटनेवर महापौरांची...

‘तीन-तीन वेळा इशारा देऊनही लोकं बाहेर निघायला तयार नाहीत’; मुंबईतील दुर्घटनेवर महापौरांची प्रतिक्रिया

Subscribe

मध्यरात्रीपासून मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आता विश्रांती घेतली आहे. या मुसळधार पावसामुळे एकीकडे रस्ते, घरं जलमय झाले आहेत, तर दुसरीकडे भिंत आणि दरड कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. विक्रोळी आणि भांडूपमध्ये घरं आणि भिंत कोसळली असून चेंबूरमध्ये दरड कोसळली आहे. या तिन्ही दुर्घटनेमध्ये आतापर्यंत २६ निष्पाप जिवांचा जीव गेला आहे. याबाबत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दुःख व्यक्त केले आणि म्हणाल्या की, ‘यासंदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तीन-तीन वेळा इशारा देऊन तिथे जाऊनही लोकं बाहेर निघायला तयार नाहीत. मग जेव्हा अशावेळी महापालिका कारवाई करते तेव्हा मात्र विरोध होतो. चेंबूरमधल्या घटनेची माहिती घेतली त्यावेळी अधिकाऱ्यांनी हेच सांगितले. या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना तीन-तीन वेळा जाऊन सांगण्यात आले होते की, तुमची घरं दरडीच्या खालीची आहेत. त्यामुळे स्थलांतरीत करण्याबाबत सांगितलं होते ‘

महापौर म्हणाल्या की, ‘मुंबईत दरड कोसळून झालेली घटना ही अत्यंत दुख:द आहे. मुंबई रेकॉर्डब्रेक पाऊस होता. वसई, विरार, पालघर सगळीकडेच जलमय झाले आहे. पावसाची इशारा देत असतो. त्यावेळी अशा धोकादायक ठिकाणी घरे असणाऱ्या नागरिकांनाही घरे खाली करण्याच्या सूचना देतो. पण लोक घरं सोडणं पसंत करत नाहीत. या दुर्घटनेचा रात्रभर आढावा घेत बचाव पथक घटनास्थळी पाठवले असून नागरिकांचा बचाव केला जात आहे. पोलीस, एनडीआरएफ, पालिका, डॉक स्कॉर्ड यांसारख्या यंत्रणा आपल्या परीने काम करत आहेत. मात्र ही दुख;दायक आणि क्लेशदायक घटना आहे. हिंदमाता परिसरात पाण्याचा निचरा करण्यासाठी भूमिगत टाक्यांच्या कामासंदर्भात काम सुरू आहे. प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी करणार आहे.’

- Advertisement -

मुंबई महापालिका दरवर्षी डोंगराळ भागात, धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या, धोकादायक संरक्षक भिंतीजवळ राहणाऱ्या नागरिकांना दुर्घटना होण्याची व त्यात जीवित, वित्तीय हानी होण्याची शक्यता लक्षात घेता पावसाळयापूर्वीच नोटिसा बजावून धोक्याचा पूर्वइशारा देते, अशी माहिती स्थानिक वार्ड कार्यालयातून अधिकाऱ्यांनी दिल्याचे महापौरांनी सांगितले.


हेही वाचा – दरड कोसळून मृत्यूमुखी पडलेल्या मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत – आदित्य ठाकरे

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -