Friday, April 16, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी किमान ४५ वयोगटासाठी पुरेल इतका तरी लस पुरवठा करा, महापौरांचाही केंद्राला चिमटा

किमान ४५ वयोगटासाठी पुरेल इतका तरी लस पुरवठा करा, महापौरांचाही केंद्राला चिमटा

Related Story

- Advertisement -

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे कोरोना चाचणी आणि लसीकरणावर अधिक भर दिला जात आहे. पण याच दरम्यान मुंबईत पुढील ३ दिवस पुरेल इतकाच लसीचा साठा असल्याची धक्कादायक बाब समोर आली. याच पार्श्वभूमीवर महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन किमान ४५ वयोगटासाठी पुरेल इतका तरी लस पुरवठा करा, असे म्हणत केंद्राला चिमटा काढला. तसेच लवकरात लवकर केंद्राने मुंबईला लस पुरवठा करावा, अशी मागणी केली.

महापौर नेमक्या काय म्हणाल्या?

‘मुंबईत कालपर्यंत १ लाख ७६ हजार इतका लसीचा साठा होता. आता ही संख्या कमी झाली आहे. मुंबईत लसीचा तुटवडा होत असेल, तर केंद्राने पाठपुरावा करून लवकरात लवकर लस पुरवठा करावा. कारण जर लसीचा तुटवडा झाला तर दुसरा डोस देण्यात अडचणी येतील. त्यामुळे किमान ४५ वयोगटासाठी पुरेल इतका तरी लस पुरवठा करा. दरम्यान मुंबईतून सर्वाधिक महसूल मिळतो, तरी मुंबईत लसीचा तुटवडा होणे हे दुर्दैव आहे. महाराष्ट्रला अधिक लस पुरवठा करणे गरजेचं आहे,’ अशा महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

- Advertisement -

‘सध्या २५ ते ४० वयोगटातील व्यक्तींना कोरोना धोका जास्त असल्याचे समोर येत आहे. तसेच रुग्ण वाढ होते आहे, याच अनुषंगाने अनावश्यक गर्दी टाळणे गरजेचे आहे. कन्टेन्मेंट झोन म्हणून जाहीर झालेल्या सोसायट्यांनी शिस्त बाळगने महत्त्वाचे आहे. व्यापाऱ्यांचे दुःख कळतं आहे. मात्र त्यांनी राजकारणाला बळी पडू नये. तसेच व्यापाऱ्यांनी निर्देशासाठी एकत्र येऊ नये,’ अशी हात जोडून महापौरांनी व्यापाऱ्यांना विनंती केली.


हेही वाचा – ठाण्यात लसीचा तुटवडा , पाच दिवस पुरेल इतकाच साठा उपलब्ध


- Advertisement -

 

- Advertisement -