बाळासाहेब ठाकरे पुतळ्याचे अनावरण कार्यक्रम : महापौरांसह उद्योगमंत्र्यांनी घेतला आढावा

Mayor

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णआकृती पुतळ्याचे शनिवारी सायंकाळी ६ वाजता बाळासाहेबांच्या जयंतीदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते अनावरण होणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार, उप मुख्यमंत्री अजित पवार, मनसेचे नेते राज ठाकरे, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आदी दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम निर्विघ्नपणे आणि उत्साहात पार पडावा, यासाठी सध्या श्यामाप्रसाद मुखर्जी चौक, रिगल सिनेमासमोर ज्या ठिकाणी पुतळा बसवला आहे. तेथील पूर्वतयारीचा आढावा उद्योग मंत्री सुभाष देसाई, महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्वतः शुक्रवारी सायंकाळी उशिराने भेट देऊन घेतला आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ते दिशानिर्देश दिले. याप्रसंगी उप महापौर ॲड. सुहास वाडकर, सभागृह नेते विशाखा राऊत, नगरसेवक आशिष चेंबूरकर, महापालिका उप आयुक्त (परिमंडळ -१) हर्षद काळे उपस्थित होते.