घरमुंबईकचरामुक्त अभियानाच्या उद्घाटनात सरकारला महापौरांचा विसर!

कचरामुक्त अभियानाच्या उद्घाटनात सरकारला महापौरांचा विसर!

Subscribe

मुंबई महानगर पालिका आणि मुंबई पोलीस यांनी संयुक्तपणे सुरू केलेल्या एका प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमाला चक्क मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनाच डावललं गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मुंबई पोलिसांच्या सहकार्याने आणि मुंबई महापालिकेच्या पुढाकाराने कचरामुक्त मुंबई अभियान राबवण्यात येणार असून याचा शुभारंभ सोमवारी मुख्यमंत्री आणि मुंबई पोलिस आयुक्तांच्या हस्ते पार पडणार आहे. परंतु या शुभारंभाच्या कार्यक्रमात चक्क मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनाच डावलण्यात आलं आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत कचरामुक्त मुंबई मोहिमेवरून श्रेयाचं राजकारण सुरु झालं असून महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांना निमंत्रण पत्रिकेवर स्थान देणार्‍या सरकारने महापौरांना मात्र त्यातून वगळल्याचं आता समोर आलं आहे.

Mayor Vishwanath Mahadeeshwar

अभियानाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते

मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी अधिकाधिक स्वच्छता रहावी, तसेच या अनुषंगाने नागरिकांमध्ये अधिक प्रभावी जाणीव जागृती व्हावी, यासाठी बृहन्मुंबई महापालिका नियमितपणे सातत्यपूर्ण प्रयत्न करत आहे. याच प्रयत्नांची परिणामकारकता वाढावी, यासाठी दर महिन्यातील सर्व शनिवार-रविवार सहित किमान १० दिवस लोकसहभागातून आणि मुंबई पोलिसांच्या सहकार्याने महापालिकेद्वारे संयुक्त ’कचरामुक्त मुंबई अभियान’ राबवण्यात येणार आहे. या अभियानाचं उद्धाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवार, दि. २९ जुलै २०१९ रोजी सकाळी ११:३० वाजता मुंबई पोलीस मुख्यालयात पार पडणार आहे. या उद्घघाटन कार्यक्रमाला गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील आणि दीपक केसरकर यांचे नाव निमंत्रण पत्रिकेवर छापण्यात आले आहे.

- Advertisement -

शिवसेनेच्या नेत्यांनाही आमंत्रण नाही!

मुंबई महापालिकेचा या मोहिमेत महत्वाचा सहभाग आहे. मुंबई पोलीस दल आणि मुंबई महापालिका संयुक्तपणे ही मोहीम राबवणार आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी आणि मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांची नावे निमंत्रण पत्रिकेवर आहेत. पण त्या निमंत्रण पत्रिकेत महापौरांना स्थानच देण्यात आलेले नाही. महापालिकेत शिवसेनेची सत्ता असूनही फक्त महापौरच नाही तर शिवसेनेच्या मोठ्या नेत्यांनाही याचे आमंत्रण देण्यात आलेले नाही! मात्र, ही बाब लक्षात आल्यानंतर पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी महापौरांना फोन करून कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती केल्याचे समजते. मात्र, अपमानास्पद वागणूक मिळाल्याने महापौर कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -