घरक्रीडाकरोनासाठी एमसीएकडून सरकारला ५० लाखांची मदत!

करोनासाठी एमसीएकडून सरकारला ५० लाखांची मदत!

Subscribe

एमसीएने करोनाविरुद्धच्या लढ्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीला ५० लाखांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

करोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना केंद्र आणि राज्य शासनाकडून खबरदारीची विविध पावले उचलण्यात येत आहेत. सध्या संपूर्ण भारत लॉकडाऊन असल्याने देशाला बरेच आर्थिक नुकसानही होत आहे. अशात अनेक लोक आणि संस्था शासनाला मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. आता यात मुंबई क्रिकेट असोसिएशनचाही (एमसीए) समावेश झाला आहे. एमसीएने करोनाविरुद्धच्या लढ्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीला ५० लाखांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. एमसीएचे अध्यक्ष डॉ. विजय पाटील यांनी आज (गुरुवारी) एमसीएच्या वरिष्ठ कौन्सिलच्या सदस्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. या बैठकीत हा निर्णय झाला.

विलगीकरण कक्ष तयार करण्यासाठी स्टेडियम

करोनाच्या रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष तयार कण्यासाठी गरज भासल्यास राज्य शासनाला मदत म्हणून आपले मैदान वापरू देण्यासही एमसीए तयार आहे. ‘महाराष्ट्र शासनाला आम्ही शक्य तितकी मदत करू. सध्याची परिस्थिती फारच अवघड आणि गंभीर आहे. या परिस्थितिशी सामना करताना शासनाला पूर्ण मदत करण्याचा आमचा प्रयत्न असेल. विलगीकरण कक्ष तयार करण्यासाठी गरज भासल्यास आम्ही राज्य शासनाला वानखेडे स्टेडियम वापरायला देऊ’, असे एमसीएचे सचिव संजय नाईक म्हणाले. मंगळवारीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांसाठी संपूर्ण देश लॉकडाऊन असणार आहे, अशी घोषणा केली होती. त्यामुळे एमसीएने आपल्या सर्व स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत रद्द केल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा  – लॉकडाऊनमध्ये कुत्र्याने केले असे काम, झाला हिरो


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -