दिल्लीपेक्षा मुंबईत कोरोना रूग्ण मृत्यूदर कमीच – महापालिका आयुक्त

मुंबईतल्या कोरोना रूग्णसंख्येत पाचव्या दिवशी घट

Duke University claims to have a worse epidemic than Corona in after 60 years
काय सांगता! ६० वर्षांनी येणार कोरोनापेक्षा भयंकर महामारी, ड्यूक युनिव्हर्सिटीचा दावा

मुंबईत कोरोना रूग्णांच्या संख्येत सलग पाचव्या दिवशी घट झाल्याचा दावा मुंबईचे महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी केला आहे. मुंबईत झालेल्या एकुण ४७ हजार चाचण्यांपैकी ७ हजार मुंबईकरांची कोरोनाची चाचणी पॉझिटीव्ह आल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईत सद्यस्थितीला ३६८५ बेड्स रिक्त असल्याचा दावाही आयुक्तांनी केला आहे. मुंबईतील हॉस्पिटलमध्ये एकुण २१ हजार १६९ इतक्या बेड्सपैकी ३६८५ बेड्स रिक्त असल्याची आकडेवारी डॅशबोर्डच्या माध्यमातून आयुक्तांनी जाहीर केली आहे. तर मास्क न वापरणाऱ्या २६ लाख मुंबईकरांना दंड आकारण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुंबईतील कोरोनाच्या परिस्थितीतही मृत्यूदर कमी असल्याचा दावा आयुक्तांनी केला आहे. दिल्लीच्या तुलनेत मुंबई शहराचा मृत्यूदर हा ०.०३ टक्के म्हणजे दिवसाला सरासरी १३ मृत्यू इतका असल्याची आकडेवारी पालिका आयुक्तांनी जाहीर केली.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरूवात झाल्यापासून मुंबईत २ लाख ६६ हजार इतकी कोरोना रूग्णांची आकडेवारी आहे. तर मुंबईत गेल्या ७० दिवसांमध्ये ९५३ जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत एकाच दिवशी २४० मृत्यू झाल्याची आकडेवारीही चहल यांनी स्पष्ट केली. मुंबईत झालेल्या ४५ हजार इतक्या चाचण्यांमध्ये ७ हजार ७२ जणांच्या चाचण्या पॉझिटीव्ह आल्या. गेल्या पाच दिवसात सातत्याने कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होत आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचा आकडा हा १० हजारांच्या पुढे गेला होता. पण गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांच्या आकडेवारीत घट झाली आहे. मुंबईतल्या कोरोना रूग्णांच्या आकडेवारीत ८७ टक्के नागरिक असिम्पटोमॅटिक असल्याचे समोर आले आहे.

मुंबईत कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांसाठी बेड्स मिळत नसल्याच्या तक्रारी एकीकडे समोर येत आहेत, तरीही दुसरीकडे पालिका आयुक्तांचा बेड्स उपलब्ध असणारा दावा हा विरोधी असे चित्र मांडणारा आहे. मुंबईत काही ठिकाणी कोरोना रूग्णांसाठी बेड्स मिळत नसल्याची दखल खुद्द मुंबईच्या महापौरांनी घेतल्याचे उदाहरण ताजे आहे. याठिकाणी थेट वॉर्डचा हेल्पलाईन कंट्रोल रूममध्ये जाऊन महापौरांना रूद्रावतार पहायला मिळाला होता. पण त्याउलट आयुक्तांचा दावा हा मात्र विरोधाभास मांडणारा असाच आहे.