घरताज्या घडामोडीएमडी ड्रग्ज तस्करीप्रकरणी मुख्य आरोपीस अटक

एमडी ड्रग्ज तस्करीप्रकरणी मुख्य आरोपीस अटक

Subscribe

कोट्यवधी रुपयांच्या एमडी ड्रग्ज तस्करीप्रकरणी वॉण्टेड असलेल्या मुख्य आरोपीस जुहू एटीएस अधिकार्‍यांनी अटक केली आहे.

कोट्यवधी रुपयांच्या एमडी ड्रग्ज तस्करीप्रकरणी वॉण्टेड असलेल्या मुख्य आरोपीस गुरुवारीजुहू एटीएस अधिकार्‍यांनी अटक केली आहे. कलीकुल जमा खान ऊर्फ खली ऊर्फ केके ऊर्फ खलीभाई असे या २७ वर्षीय आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक यांनी सांगितले. तो मुंबईसह इतर शहरात एमडी ड्रग्ज सप्लायर करणारा मुख्य आरोपी असल्याचे बोलले जाते.

असे केले अटक

गेल्या आठवड्यात साकिनाका परिसरातून दिलशाद अब्दुल कलाम खान आणि इम्रान कमालउद्दीन शेख या दोन आरोपींना पोलीस निरीक्षक दया नायकांसह यांच्या पथकाने अटक केली होती. या दोघांकडून पोलिसांनी पावणेतीन किलो वजनाचे एमडी ड्रग्ज, एक बॅग, एक बाईक असा १ कोटी ३७ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. पोलीस तपासात या दोघांनी त्यांना ते एमडी ड्रग्ज खलीभाई याने दिल्याचे सांगितले आहे. मात्र, कारवाईपूर्वीच खलीभाई तेथून पळून गेला होता. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी एटीएस अधिकार्‍यांनी विशेष मोहीम सुरु केली होती. ही शोधमोहीम सुरु असताना खलीभाई मरोळ नाका परिसरात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दया नायक यांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून खलीभाई याला शिताफीने अटक केली आहे.

- Advertisement -

या गुन्ह्यांत त्यासा सोमवार २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात येणार आहे. एमडी ड्रग्ज विक्री करणारी ही एक सराईत टोळी असून या टोळीने आतापर्यंत कोट्यवधी रुपयांच्या ड्रग्जची विक्री केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यांनी हा ड्रग्ज कोठून आणला होता. त्याची त्यांनी कोणाला विक्री केली आहे, खलीभाई हा इतर दोघांच्या मदतीने ड्रग्ज विक्रेत्यांना एमडीची विक्री करीत होता. त्यामुळे त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. दरम्यान, याच गुन्ह्यांत अटकेत असलेल्या दोनपैकी एका आरोपीची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी जी. टी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


हेही वाचा – अभ्यासक्रम कपातीनंतर घटक चाचणीबाबत संभ्रम

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -