घरमुंबईआता माफक दरात मिळणार अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा

आता माफक दरात मिळणार अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा

Subscribe

कल्‍याण-डोंबिवली महानगरपालिका आणि क्रस्ना डायग्नोस्टिक्स यांच्यावतीने पालिकेच्या डोंबिवली येथील शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये पीपीपी तत्‍वावर अत्याधुनिक सीटीस्कॅन तसेच एमआरआय सोनाग्राफी आणि पॅथोलॉजी सेवा सुरू करण्यात येणार आहेत.

कल्‍याण-डोंबिवली महानगरपालिका आणि क्रस्ना डायग्नोस्टिक्स यांच्यावतीने पालिकेच्या डोंबिवली येथील शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये पीपीपी तत्‍वावर अत्याधुनिक सीटीस्कॅन तसेच एमआरआय सोनाग्राफी आणि पॅथोलॉजी सेवा सुरू करण्यात येणार असून, सोमवारी या कामाचे भूमीपूजन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते पार पडला. सर्वसामान्‍यांना माफक दरात येत्‍या दोन महिन्‍यात या सुविधा उपलब्‍ध करुन दिल्‍या जाणार आहेत. तसेच कल्‍याण-डोंबिवली येथे किडनीच्‍या आजारांनी त्रस्‍त असलेल्‍या रुग्‍णांना डायलिसीस सुविधादेखील लवकरच उपलब्‍ध करुन दिली जाणार असल्‍याचे आश्‍वासन खासदारांनी दिले.

सुविधेस सर्वसाधारण सभेत मंजुरी

महापालिकेच्‍या रुक्मिणीबाई आणि शास्त्रीनगर या दोन्‍ही हॉस्पिटल्समध्‍ये पीपीपी तत्‍वावर रेडीओलॉजी तसेच पॅथोलॉजी सुविधा उपलब्‍ध करण्‍यासाठी मे. क्रस्‍ना डायग्‍नोस्‍टीक (पुणे) यांची नियुक्‍त करण्‍यास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिल्‍यानंतर सोमवारी ही सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यासाठीच्‍या कामाचे भूमीपूजन करण्‍यात आले. खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, हा उपक्रम कळवा हॉस्पिटलमध्ये सुरु केला आहे. त्‍यामुळे तिथे हा उपक्रम यशस्‍वी झाल्‍यानंतर कल्‍याण-डोंबिवली महापालिकेच्‍या हॉस्पिटलमध्‍ये सुरु करण्‍याचा निर्णय घेतला आहे. तसेच सर्वसामान्य रूग्णांना माफक दरात या सुविधा उपलब्ध होणार आहेत.

- Advertisement -

रुग्‍णांची परवड थांबेल 

महापालिका आयुक्‍त गोविंद बोडके यांनी सांगितले की, पीपीपी तत्‍वावर ही योजना सुरु केली जात असून केंद्र शासनाने ठरवून दिलेल्‍या माफक दरात सिटीस्‍कॅन, सोनोग्राफी, एमआरआय अशा प्रकारच्‍या सुविधा नागरिकांना उपलब्‍ध होणार आहेत. सभापती दिपेश म्‍हात्रे म्‍हणाले की, या सुविधेमध्‍ये पॅथोलॉजी अंतर्गत महापालिकेच्‍या नागरी आरोग्‍य केंद्राअंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्‍णांचे रक्‍त, लघवीचे नमुने संकलित करुन मध्‍यवर्ती ठिकाणी त्‍याचा अहवाल तयार करण्‍यात येवून दुसऱ्या दिवशी तो अहवाल नागरी आरोग्‍य केंद्रामध्‍ये पाठवण्‍यात येईल. त्यामुळे रुग्‍णांची परवड होणार नाही. याप्रसंगी महापौर विनिता राणे, अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर, सभागृह नेते श्रेयस समेळ, गटनेते दशरथ घाडीगावकर, वैद्यकीय आरोग्‍याधिकारी डॉ. राजु लवंगारे, प्रभाग समिती सभापती वृशाली जोशी, पालिका सदस्‍या गुलाब म्‍हात्रे, रमेश म्‍हात्रे, राजेश मोरे, दिपाली पाटील महापालिका सचिव संजय जाधव उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -