घरमुंबईवेतनवाढीसाठी डॉक्टरांचा पुन्हा संपावर जाण्याचा इशारा

वेतनवाढीसाठी डॉक्टरांचा पुन्हा संपावर जाण्याचा इशारा

Subscribe

येत्या १३ जूनपासून असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न्सने बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. वारंवार वेतनवाढीसाठी पाठपुरावा करुनही दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्यामुळे बुधवारी पुन्हा एकदा प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांना असोसिएशनच्या वतीने लेखी पत्राद्वारे संपाचा इशारा देण्यात आला आहे.

वेतनवाढीवर अजूनही निर्णय नाही –

- Advertisement -

१५ जुलै २०१५ साली इंटर्न्स डॉक्टरांना ११ हजार वेतनमान मिळावे,  हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर, दरवर्षी पाठपुरावा केल्यानंतरही वेतनात वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे २६ एप्रिल २०१८ रोजी राज्यभरातील शासकीय वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयातील इंटर्न्स डॉक्टरांनी मूकमोर्चा काढत निषेध केला होता. त्यानंतर, २ मे रोजी वैद्यकीय शिक्षण संचालनालय आणि अर्थ विभागाच्या पदाधिकाऱ्यांच्या सोबत झालेल्या बेठकीत तातडीने इंटर्न्सना वेतनवाढ करण्याचे आश्वासन देण्यात आले. पण, अजूनही यावर कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला नाही. सध्या राज्यभरात २ हजार ३०० इंटर्न्स डॉक्टर्स आहेत. जर हे डॉक्टर्स संपावर गेले तर कदाचित त्याचा परिणाम रुग्णसेवेवर होऊ शकतो.

लेखी पत्राद्वारे संपाचा इशारा  

- Advertisement -

राज्यातील शासकीय वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयातील इंटर्न्स डॉक्टरांना काही दिवसांपूर्वी वेतनवाढीसंदर्भात वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने आश्वासन दिले होते, परंतु त्याची पूर्तता होत नसल्याने बुधवारी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांना असोसिएशनच्या वतीने लेखी पत्राद्वारे संपाचा इशारा देण्यात आला आहे.

“ सरकारी दिरंगाईमुळे चार वर्षांपासून इंटर्न्सच्या वेतनाचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे आता सरकारने तातडीने शासन निर्णय जारी न केल्यास, राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील इंटर्न्स डॉक्टर १३ जूनपासून बेमुदत संपावर जाणार आहेत, तरी तातडीने प्रशासनाने याविषयी निर्णय घ्यावा. जुलै २०१५ साली इंटर्न्स डॉक्टरांना ११ हजार वेतनमान मिळावे हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर, दरवर्षी पाठपुरावा करूनही यात वाढ करण्यात आली नाही. त्यामुळे इतर कुठलाच पर्याय शिल्लक राहिला नसल्याने संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ”

गोकुळ राख, सचिव, असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न्स

 

 

 

 

 

 

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -