घरमुंबईडॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात पहिली अटक

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात पहिली अटक

Subscribe

डॉ. पायल तडवी हिला न्याय मिळाला पाहिजे. तसेच आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे.

नायर हॉस्पिटलमधील स्त्रीरोग विभागात शिकणाऱ्या डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी पहिली अटक केली आहे. डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी डॉ. भक्ती मेहेरला पोलिसांनी अटक केली आहे. इतर दोघी अटकपूर्व जामिनासाठी गेल्या आहेत. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या डॉ. भक्ती मेहेरला उद्या शिवडी कोर्टात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, पायल आत्महत्या प्रकरणातील तिन्ही आरोपी डॉक्टरांचे निलंबन करण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण ?

डॉ. पायल तडवी या नायर हॉस्पिटलमध्ये पीजीच्या पहिल्या वर्षात शिकत होत्या. हॉस्पिटलच्याच आवारातील वसतीगृहात त्या राहत होत्या. पण, तिथे पहिल्या दिवसापासून डॉ. आहुजा, डॉ. मेहेर आणि डॉ. खंडेलवाल यांनी जातीवरुन डॉ. पायलला त्रास देण्यात सुरूवात केली, अशी तक्रार डॉ. पायल यांच्या आईने केली आहे. याबाबत पायल यांनी हॉस्पिटलचे अधिष्ठाते, वसतीगृहाच्या वॉर्डन आणि व्याख्याते यांच्याकडे तक्रार केली होती. पण, तरीही छळ न थांबल्याने त्यांनी आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. बुधवारी डॉ. पायलने वसतीगृहातील राहत्या घरात गळफास घेऊन डॉ. पायल यांनी आत्महत्या केली.

- Advertisement -

आत्महत्या नसून हत्या ?

डॉ. पायल तडवी प्रकरणावरुन दिवसेंदिवस चिघळत चालले आहे. डॉ. पायलच्या आत्महत्येस कारणीभूत ठरणाऱ्यांना अटक करावी आणि या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, या मागणीसाठी सर्वच स्तरावरुन निषेध व्यक्त केला जात आहे. सोमवारी नायर हॉस्पिटलच्या आवारात अनेक सामाजिक संघटनांनी एकत्र येत पायलच्या न्यायासाठी निषेध व्यक्त केला आहे. डॉ. पायल तडवी हिला न्याय मिळाला पाहिजे. तसेच आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे. डॉ. पायलची आत्महत्या नसून हत्या असल्याचा देखील आरोप केला जात आहे.

हेही वाचा – 

- Advertisement -

डॉ. पायल तडवीच्या मृत्यूप्रकरणी नायर रुग्णालयाबाहेर आंदोलन

डॉ. पायल तडवी आत्महत्या; आरोपी म्हणतायत ‘आमचीही बाजू ऐकून घ्या’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -