घरताज्या घडामोडीमध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

Subscribe

मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवार २३ एप्रिल रोज मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांत मेगाब्लॉक परीचालीत करणार आहे. त्यामुळे रविवारी लोकलने प्रवास करण्याच्या विचारात असाल तर, रेल्वेचं बदलेले वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा. 

मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवार २३ एप्रिल रोज मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांत मेगाब्लॉक परीचालीत करणार आहे. त्यामुळे रविवारी लोकलने प्रवास करण्याच्या विचारात असाल तर, रेल्वेचं बदलेले वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा.

मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. तसेच, हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी / वांद्रे या मार्गावर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. (Mega block on central and harbor railway line on sunday)

- Advertisement -

मध्य रेल्वे

मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान अप आणि डाउन धिम्या मार्गावर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. रविवारी सकाळी ११.०५ वाजल्यापासून ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल.

- Advertisement -

या ब्लॉकच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.१८ या वेळेत सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. त्यानंतर मुलुंड स्थानकावर धिम्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. तसेच, नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचेल.

शिवाय, ठाणे येथून सकाळी १०.५८ ते दुपारी ३.५९ या वेळेत अप धिम्या मार्गावरील लोकल मुलुंड आणि माटुंगादरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकावर थांबतील. त्यानंतर पुढे अप धीम्या मार्गावर पुन्हा वळवल्या जातील आणि नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचतील.

हार्बर मार्ग

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी/वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० वाजेपर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल.

या ब्लॉकच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलकरीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील लोकल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगावकडे जाणारी डाउन हार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक ८) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वे मार्गे प्रवास करण्याची परवानगी असेल.


हेही वाचा – कर्नाटक विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ‘इतक्या’ जागा लढवणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -