घरताज्या घडामोडीमध्य आणि हार्बर मार्गावर उद्या 'या' वेळेत असणार मेगाब्लॉक

मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या ‘या’ वेळेत असणार मेगाब्लॉक

Subscribe

मध्य रेल्वे मार्गावर उद्या (रविवार) मेगाब्लॉक असणार आहे. देखभाल आणि दुरुस्तीचे कार्य करण्यासाठी उपनगरी भागांवर मेगाब्लॉक घेणार आहे. त्यानुसार मध्य रेल्वे मार्गावरील माटुंगा – मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्ग सकाळी ११.०० ते दुपारी ४.०५ या वेळेत मेगब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी १०.२५ ते दुपारी ३.४४ या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटणाऱ्या डाऊन जलद सेवा माटुंगा येथे डाऊन धीम्या मार्गावर वळविली जातील. तसेच सायन व मुलुंड दरम्यानच्या सर्व स्थानकांवर थांबतील आणि नियोजित वेळेपेक्षा आपल्या गंतव्यस्थानावर १५ मिनिटे उशिरा पोहोचतील. ठाण्यापलीकडील जलद गाड्या मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर पुन्हा वळविण्यात येतील.

सकाळी १०.४६ ते दुपारी ३.२६ या वेळेत ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद सेवा मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळविण्यात येतील आणि मुलुंड ते दादर स्थानकांदरम्यानच्या सर्व स्थानकांवर थांबतील. नियोजित वेळेपेक्षा गंतव्यस्थानावर १५ मिनिटे उशिरा पोहोचतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या अप जलद सेवा परळ येथे पुन्हा अप जलद मार्गावर वळविण्यात येतील.

- Advertisement -

हार्बर मार्गावर मेगाब्लॉक 

पनवेल-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्ग सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ या वेळेत (बेलापूर / नेरुळ-खारकोपर मार्गासह) मेगाब्लॉक असणार आहे. तसेच सकाळी १०.४९ ते दुपारी ४.०१ दरम्यान पनवेल / बेलापूरहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.०३ ते दुपारी ३.१६ दरम्यान पनवेल / बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द होईल.

सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ या वेळेत पनवेलहून ठाणेकडे जाणाऱ्या ट्रान्स हार्बर मार्गावरील अप सेवा आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० पर्यंत पनवेल / बेलापूर साठी जाणाऱ्या डाऊन मार्गावरील सेवा रद्द होईल.
तथापि, ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशी विभागात विशेष गाड्या धावतील. ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी स्थानकांदरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा उपलब्ध राहील.

- Advertisement -

पायाभूत सुविधा आणि सुरक्षिततेसाठी हे देखभाल करणारे मेगाब्लॉक आवश्यक आहेत. उद्याच्या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे. तरीही प्रवाशांनी या दिवशी सहकार्य करावे, अशी विनंती रेल्वे प्रशासनास केली आहे.


हेही वाचा – पुलांच्या कामांसाठी पालिका रेल्वेला मोजणार ७०० कोटी रुपये


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -