Maharashtra Assembly Election 2024
घरमुंबईMumbai Local Mega Block : मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक; जाणून घ्या...

Mumbai Local Mega Block : मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक; जाणून घ्या वेळापत्रक…

Subscribe

विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्याकरता येत्या रविवारी (01 डिसेंबर) मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा रेल्वे प्रशासनाकडून ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मुंबई : विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्याकरता येत्या रविवारी (01 डिसेंबर) मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा रेल्वे प्रशासनाकडून ब्लॉक घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मुंबई ते विद्याविहार दरम्यान सकाळी 10.55 ते दुपारी 3.25 पर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे. (Mega Block on Central and Harbour lines on December 1)

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.48 ते दुपारी 3.18 पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धिम्या मार्गावरील सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकावर थांबून विद्याविहार स्टेशन पासून पुढे डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. तसेच घाटकोपर येथून सकाळी 10.19 ते दुपारी 3.19 पर्यंत सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरील सेवा विद्याविहार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांदरम्यान थांबतील.

- Advertisement -

हेही वाचा – Waqf board : वक्फला 10 कोटी अनुदानाचा जीआर 24 तासात मागे; फडणवीसांचे ट्विट चर्चेत, पडद्यामागे काय घडतंय!

पनवेल-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 पर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात नेरुळ/बेलापूर आणि उरण बंदर मार्ग वगळण्यात येणार आहेत. पनवेल येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 या वेळेत सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईकडे जाणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 पर्यंत सुटणारी पनवेल/बेलापूर डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. तसेच पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 पर्यंत सुटणारी ठाण्याच्या दिशेने जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत सुटणारी पनवेलकडे जाणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

- Advertisement -

ब्लॉक कालावधीत सीएसएमटी मुंबई-वाशी सेक्शनवर विशेष लोकल धावणार आहेत. तसेच ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल. याशिवाय बेलापूर/नेरुळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट लाईन सेवा उपलब्ध असेल. हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली आहे.

हेही वाचा – EVM Vs Ballot paper : बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या… आज राजीनामा देतो; जितेंद्र आव्हाडांचे भाजपला आव्हान


Edited By Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -