मुंबई : रविवारी लोकलनं प्रवास करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण मध्य रेल्वेसह हार्बर रेल्वे मार्गावर रविवार 29 डिसेंबर रोजी मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी हा मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी मुंबई ते विद्याविहार आणि हार्बर रेल्वेच्या पनवेल आणि वाशी मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. (Mega Block On Central Harbour and Transe Harbour Railway Line at Sunday)
मध्य रेल्वे
मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते विद्याविहार स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 10.55 वाजल्यापासून ते दुपारी 3.25 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या ब्लॉकमुळे 10.48 वाजल्यापासून ते दुपारी 3.18 वाजेपर्यंत सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या सीएसएमटी आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. तसेच, या लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकावर थांबतील आणि पुढे विद्याविहारला डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येईल.
शिवाय, सकाळी 10.19 वाजल्यापासून ते दुपारी 3.19 वाजेपर्यंत घाटकोपर येथून सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या विद्याविहार आणि सीएसएमटी स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांदरम्यान थांबतील.
हार्बर रेल्वे
हार्बर रेल्वे मार्गावर सकाळी 11.05 वाजल्यापासून ते दुपारी 04.05 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर हा मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. या ब्लॉकदरम्यान, सकाळी 10.33 वाजल्यापासून ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत सीएसएमटी / पनवेलकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या आणि पनवेल / बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या सकाळी 9.45 वाजल्यापासून ते दुपारी 3.12 वाजेपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.
ट्रान्स हार्बर
ट्रान्स हार्बर मार्गावर सकाळी 11.02 वाजल्यापासून ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत पनवेल येथून ठाण्याकडे जाणाऱ्या अप मार्गावरील लोकल फेऱ्या आणि ठाणे येथून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या डाऊन मार्गावरील लोकल फेऱ्या सकाळी 10.01 वाजल्यापासून ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेल.
- ब्लॉक कालावधीत सीएसएमटी मुंबई-वाशी भागावर विशेष लोकल चालतील.
- ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल.
- ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट लाईन सेवा उपलब्ध असेल.
हेही वाचा – Central Railway : धुमधडाक्यात करा 31st, मध्य रेल्वे आहे सोबत; प्रवाशांकरीता खास सुविधा