रविवार मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

रविवारी लोकलने प्रवास करण्याच्या विचारात असाल तर, जरा थांबा. कारण रविवारी रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. नियमित देखभाल दुरस्ती व अभियांत्रिकी कामासाठी मध्य रेल्वेनं मेगाब्लॉक जाहीर केला आहे.

रविवारी लोकलने प्रवास करण्याच्या विचारात असाल तर, जरा थांबा. कारण रविवारी रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. नियमित देखभाल दुरस्ती व अभियांत्रिकी कामासाठी मध्य रेल्वेनं मेगाब्लॉक जाहीर केला आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. तसेच, हार्बर रेल्वेच्या पनवेल ते वाशी मार्गावर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. (Mega block on central railway and harbor railway line)

मध्य रेल्वे

मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यानच्या अप आणि डाउन धिम्या मार्गावर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. रविवारी सकाळी ११.०० वाजल्यापासून ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या ब्लॉकच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई (सीएसएमटी) येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.१८ या वेळेत सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील. तसेच, शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. यानंतर पुढे मुलुंड स्थानकावर धिम्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि नियोजित आगमनापेक्षा १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचेल.

या ब्लॉकच्या कालावधीत ठाणे येथून सकाळी १०.५८ ते दुपारी ३.५९ या वेळेत अप धिम्या मार्गावरील लोकल मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. तसेच, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकावर थांबतील. पुढे अप धीम्या मार्गावर पुन्हा वळवल्या जातील आणि नियोजित आगमनापेक्षा १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचतील.

हार्बर रेल्वे

हार्बर रेल्वेच्या पनवेल ते वाशी स्थानकादरम्यानच्या अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. रविवारी सकाळी ११.०५ वाजल्यापासून ते संध्याकाळी ४.०५ वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. या ब्लॉकच्या कालावधीत बेलापूर/नेरुळ – खारकोपर मार्ग वगळण्यात आला आहे.

या ब्लॉकच्या कालावधीत पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत सुटणारी ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत पनवेल करीता जाणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

या ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- वाशी भागात विशेष लोकल धावतील. तसेच, ब्लॉक कालावधीत ठाणे – वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असतील. शिवाय, ब्लॉक कालावधीत बेलापूर – खारकोपर आणि नेरुळ – खारकोपर दरम्यान लोकल ट्रेन वेळापत्रकानुसार धावतील.


हेही वाचा – उद्धव ठाकरे हे वाघाचे पुत्र, येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये त्यांचा विजय होईल – अरविंद केजरीवाल