घरताज्या घडामोडीरेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

Subscribe

रविवारी रेल्वे प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे.

रविवारी रेल्वे प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान आणि हार्बर रेल्वेच्या पनवेल ते वाशी स्थानकादरम्यान मेगाब्लॉक असणार आहे. (Mega block on central railway and harbor railway line )

मध्य रेल्वे

- Advertisement -

मध्य रेल्वेच्या ठाणे-कल्याण स्थानकादरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी १०.४० वाजल्यापासून ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या ब्लॉकच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई (CSMT) येथून सकाळी ९.३० ते दुपारी २.४५ या वेळेत सुटणाऱ्या डाउन जलद सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या त्यांच्या शेड्यूल थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांदरम्यान थांबतील आणि निर्धारित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.

कल्याण येथून सकाळी १०.२८ ते दुपारी ३.२५ पर्यंत सुटणाऱ्या अप जलद गाड्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या त्यांच्या वेळापत्रकाच्या थांब्यांव्यतिरिक्त दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांदरम्यान थांबून पुन्हा अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि 10 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.

- Advertisement -

हार्बर रेल्वे

हार्बर रेल्वेच्या पनवेल ते वाशी वाशी स्थानकादरम्यान अप आणि डाउन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. सकाळी ११.०५ वाजल्यापासून ते सायंकाळी ४.०५ वाजेपर्यंत
(बेलापूर/नेरुळ – खारकोपर मार्ग वगळून) हा मेगाब्लॉक असणार आहे.

पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत सुटणारी ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत पनवेल करीता जाणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

  • ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- वाशी भागात विशेष लोकल धावतील.
  • ब्लॉक कालावधीत ठाणे – वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असतील.
  • ब्लॉक कालावधीत बेलापूर – खारकोपर आणि नेरुळ – खारकोपर दरम्यान लोकल ट्रेन वेळापत्रकानुसार धावतील.

हेही वाचा – 63 वर्षीय प्रवाशाकडून विमानात एअर होस्टेसचा विनयभंग; आरोपीला अटक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -