घरताज्या घडामोडीमध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक, घराबाहेर पडताना 'हे' वेळापत्रक जरुर वाचा

मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक, घराबाहेर पडताना ‘हे’ वेळापत्रक जरुर वाचा

Subscribe

मुंबईतील रेल्वे प्रवाशांनो रविवारी घराबाहेर पडण्याआधी मेगाब्लॉकचे वेळापत्रक वाचूनचं बाहेर पडा. कारण रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गांवर रविवारी म्हणजेच 27 नोव्हेंबर 2022 रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. देखभालीचे काम करण्यासाठी उपनगरीय विभागांवर मेग ब्लॉक घोषित करण्यात आला आहे.

मुंबईतील रेल्वे प्रवाशांनो रविवारी घराबाहेर पडण्याआधी मेगाब्लॉकचे वेळापत्रक वाचूनचं बाहेर पडा. कारण रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गांवर आज, रविवारी म्हणजेच 27 नोव्हेंबर 2022 रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. देखभालीचे काम करण्यासाठी उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार, मध्य रेल्वेच्या माटुंगा-मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर आणि हार्बर रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-चुनाभट्टी/वांद्रे डाउन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. (Mega block on central railway and harbor railway line)

मध्य रेल्वे

- Advertisement -

मध्य रेल्वेच्या माटुंगा-मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी 11.05 वाजल्यापासून ते दुपारी 3.55 वाजपर्यंत मेगाब्लॉक असेल. या ब्लॉकमुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई (सीएसएमटी) येथून सकाळी 10.25 ते दुपारी 3.35 पर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावरील लोकल सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवळ्यात येणार आहेत. त्यानंतर त्या संबंधित स्थानकांवर वेळापत्रकानुसार थांबतील. तसेच, ठाणे स्थानकाच्या पुढे जलद लोकल सेवा मुलुंड येथे डाउन जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेच्या 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.

ठाणे येथून सकाळी 10.50 ते दुपारी 3.46 वाजेपर्यंत अप जलद सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. त्यानंतर वेळापत्रकानुसार त्यांच्या संबंधित स्थानकांवर थांबवल्या जातील. पुढे अप जलद लोक सेवा अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि नियोजित वेळेच्या 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.

- Advertisement -

हार्बर रेल्वे

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी/वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते संध्याकाळी 4.40 पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते संध्याकाळी 4.10 पर्यंत मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे.

या ब्लॉकमुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथून सकाळी 11.16 ते सायंकाळी 4.47 पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सकाळी 10.48 ते संध्याकाळी 4.43 वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगाव करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

या ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म 8) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. शिवाय, हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.


हेही वाचा – एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि नवस पूर्ण झाला; शिंदे गटातील आमदार म्हणाले…

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -